इंद्रायणीत वाहून गेलेल्या 3 तरुणांचे मृतदेह मिळाले

By Admin | Updated: September 4, 2014 02:12 IST2014-09-04T02:12:23+5:302014-09-04T02:12:23+5:30

गणोशविसर्जनाच्या वेळी मंगळवारी वाहून गेलेल्या तिन्ही तरुणांचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी शोधून काढले.

Found bodies of three youths who were drowned in the Indrayaniya | इंद्रायणीत वाहून गेलेल्या 3 तरुणांचे मृतदेह मिळाले

इंद्रायणीत वाहून गेलेल्या 3 तरुणांचे मृतदेह मिळाले

देहूरोड/किवळे : देहू रोडनजीक शेलारवाडी येथील इंद्रायणी नदीपात्रत गणोशविसर्जनाच्या वेळी मंगळवारी वाहून गेलेल्या तिन्ही तरुणांचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी शोधून काढले. 
गणोशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर पोहत असताना देहू रोड येथील चार जण वाहून गेले होते. अभिजित दत्तप्रसाद सोनवणो (21, मूळचा सोलापूर), कुणाल हरिजन (18, मूळचा मुंबई), प्रवीण चंडालिया (2क्) या तिघांचा बुडून मृत्यू झाला. तर, आनंद सुरेश भिल (24) हा  बचावला आहे. त्याच्यावर देहू रोड 
येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)
 
‘एनडीआरएफ’ने घेतला शोध
एनडीआरएफचे उपकमांडट पंडित इथापे यांच्या नेतृत्वाखालील 36 जवानांच्या पथकांनी  दोन बोटी व दोन पाणबुडे पाण्यात उतरविल्या. मंगळवारी रात्री पावणोदहाच्या सुमारास सोनवणोचा मृतदेह शोधला. मंगळवारी रात्री पावणोबाराच्या सुमारास हरिजनचा मृतदेह मिळाला. तर बुधवारी सकाळी त्यांनी चंडालियाचा मृतदेह काढला.

 

Web Title: Found bodies of three youths who were drowned in the Indrayaniya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.