शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

महामंडळ वाटपात ७०-३० चा फॉर्म्युला

By admin | Updated: June 7, 2015 02:43 IST

राज्यातील विविध महामंडळांवरील नियुक्त्या आठवडाभरात केल्या जाणार असून, त्यात भाजप ७० टक्केआणि शिवसेना ३० टक्के याप्रमाणे फॉर्म्युला राहील

औरंगाबाद : राज्यातील विविध महामंडळांवरील नियुक्त्या आठवडाभरात केल्या जाणार असून, त्यात भाजप ७० टक्केआणि शिवसेना ३० टक्के याप्रमाणे फॉर्म्युला राहील, असे भाजप नेते तथा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज औरंगाबादेत सांगितले.बुलडाणा जिल्ह्णातील कार्यक्रम आटोपून मुंबईला विमानाने जाण्यासाठी विनोद तावडे औरंगाबादेत आले होते. या दरम्यान, औरंगाबादेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महामंडळांच्या नियुक्त्या राहिलेल्या आहेत. त्या आठवडाभरात होणार आहेत. त्याआधी शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. या बैठकीत कोणते महामंडळ कोणाकडे राहील हे निश्चित केले जाईल; पण एकूण महामंडळ वाटपात भाजप आणि शिवसेनेमध्ये ७०-३० चा फॉर्म्युला राबविला जाईल. राज्यात भाजपचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे भाजपकडे ७० टक्के महामंडळे असतील, तर शिवसेनेच्या वाट्याला ३० टक्के महामंडळे जातील, असेही ते म्हणाले. महामंडळाच्या नियुक्त्यात पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्याही नियुक्त्या या आठवड्यात होणार आहेत. उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस या पदांवर नव्याने नियुक्त्या होतील.