नवोदयचा माजी विद्यार्थी अटकेत

By Admin | Updated: April 6, 2015 03:17 IST2015-04-06T03:17:19+5:302015-04-06T03:17:19+5:30

जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये दोन्ही आरोपी शिक्षकांना मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी सायंकाळी

Former student of Navodaya detained | नवोदयचा माजी विद्यार्थी अटकेत

नवोदयचा माजी विद्यार्थी अटकेत

अकोला : जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये दोन्ही आरोपी शिक्षकांना मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी सायंकाळी नागपूर येथील नवोदयचा माजी विद्यार्थी मंगेश मुणगणकर याला अटक केली़ या कारवाईने अटक केलेल्यांची संख्या चारवर गेली आहे़ मंगेश मुणगणकरला न्यायालयात हजर केले असता त्याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी शिक्षक आर.बी. गजभिये, शैलेश एस. रामटेके आणि शारीरिक शिक्षक संदीप लाडखेडकर यांना यापूर्वीच अटक केली आहे. गजभिये व रामटेके यांनी अटकपूर्व जामिनासाठी नागपूरला धाव घेतली होती. त्यावेळी मंगेश तुकाराम मुणगणकर याने दोघांना मदत केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी मुणगेकरला रविवारी नागपुरातून अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Former student of Navodaya detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.