विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांचे निधन

By Admin | Updated: November 15, 2015 02:59 IST2015-11-15T02:59:53+5:302015-11-15T02:59:53+5:30

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रमोद शेंडे यांचे शनिवारी नागपुरात दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

Former Speaker of Legislative Assembly Pramod Shende passes away | विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांचे निधन

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांचे निधन

नागपूर : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रमोद शेंडे यांचे शनिवारी नागपुरात दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, स्नुषा नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा रविवारी दुपारी ३ वाजता वर्धा येथील स्नेहनगर स्थित निवासस्थानावरून निघेल. मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
प्रमोद शेंडे यांची प्रकृती ठीक नसल्याने २५ आॅक्टोबर रोजी सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने २७ आॅक्टोबरला नागपूर येथील वोक्हार्ट रुग्णालयात हलविण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Former Speaker of Legislative Assembly Pramod Shende passes away