माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे निधन
By Admin | Updated: March 10, 2015 12:36 IST2015-03-10T09:08:50+5:302015-03-10T12:36:22+5:30
कोल्हापूरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे मंगळवारी मुंबईत निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.

माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे निधन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.१० - कोल्हापूरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे मंगळवारी मुंबईत निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या मंडलिक यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर आज कोल्हापूरमधील मुरगूड या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
७ ऑक्टोबर १९३४ रोजी सदाशिवराव मंडलिक यांचा जन्म झाला. कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांनी १९७२, १९८५, १९९० व १९९५ अशी चारवेळा निवडणूक लढवून विजय मिळवला.
१९९३ साली त्यांनी राज्याचे शिक्षण, पाटबंधारे व अन्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदार संघातूनही ते सलग तीन वेळा निवडून आले. तसेच लोकसभेच्या महत्त्वाच्या ८ समित्यांचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते.