शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

माजी खासदार आनंदराव अडसूळ ईडी चौकशीवेळी अत्यवस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 06:04 IST

सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून समन्स.

ठळक मुद्देसिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून समन्स.

मुंबई : अमरावतीतील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ व त्यांचे पुत्र अभिजित यांना सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावून सोमवारी त्यांच्या मुंबईतील घरी चौकशी केली जात असताना अडसूळ यांची प्रकृती अचानक बिघडली. 

अडसूळ यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, वैद्यकीय तपासणीच्या अहवालानंतर चौकशीबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. अडसूळ पिता-पुत्र माजी अध्यक्ष असलेल्या सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत ९८० कोटींचा कर्ज घोटाळा झाला आहे. याबाबत स्वतः अडसूळ यांनी बँकेच्या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे राजकीय विरोधक नवनीत राणा यांनी ईडीकडे तक्रारी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने माजी खासदार आनंदराव अडसूळ व त्यांचे ुत्र अभिजित यांच्या चौकशीबद्दल समन्स घेऊन ईडीचे सहा अधिकारी सोमवारी सकाळी त्यांच्या कांदिवली पूर्व येथील निवासस्थानी पोहोचले.

त्यांनी पिता-पुत्राकडे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात येण्याची सूचना केली. अडसूळ यांनी त्यास नकार देऊन ते पुढील तारीख मागू लागले. यावेळी झालेला वादविवाद, तसेच तणावामुळे त्यांची प्रकृती बिघडली. छातीत दुखू लागल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. ११ वाजेच्या सुमारास आनंदराव अडसूळ यांना घरातून स्ट्रेचरवरून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून गोरेगाव येथील लाइफलाइन मेडिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारवाईसाठी आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांपैकी दोघे अधिकारीही रुग्णालयात आले. डॉक्टरांचा तपासणी अहवाल येईपर्यंत ते थांबून होते.

अडसूळ यांच्यावर नेमके आरोप काय?सिटी बँकेमध्ये कामगार, पेन्शनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होती. जवळपास नऊ हजार खातेधारक होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरीत्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळ यांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यात सुमारे ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप त्यांचे विरोधक व भाजपसमर्थक आमदार रवी राणा यांनी केला आहे.

खासदारकी रद्द होणार असल्याने कारवाईभाजपला समर्थन दिलेल्या खा. नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्र बनावट दिल्याचे सिद्ध झाल्याने उच्च न्यायालयाने त्यांची खासदारकी अवैध ठरविली आहे. त्याबाबत २९ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे, त्या ठिकाणी आपल्या वडिलांना हजर राहता येऊ नये, यासाठी जाणीवपूर्वक तडकाफडकी ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी केला आहे.

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळbankबँकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयhospitalहॉस्पिटलMaharashtraमहाराष्ट्रnavneet kaur ranaनवनीत कौर राणा