मनसेचे माजी आमदार ढिकले यांचे निधन
By Admin | Updated: April 8, 2015 01:25 IST2015-04-08T01:25:57+5:302015-04-08T01:25:57+5:30
राजकारण, सहकार आणि जिल्ह्यातील समाजकारणातील अग्रणी व मनसेचे माजी आमदार अॅड. उत्तमराव ढिकले (७६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने

मनसेचे माजी आमदार ढिकले यांचे निधन
नाशिक : राजकारण, सहकार आणि जिल्ह्यातील समाजकारणातील अग्रणी व मनसेचे माजी आमदार अॅड. उत्तमराव ढिकले (७६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
नाशिकचे खासदार व महापौर म्हणूनही त्यांनी कामाचा ठसा उमटवला होता. रविवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. १९६७मध्ये ते वयाच्या २७व्या वर्षी तत्कालीन नाशिक नगरपालिकेचे सर्वांत तरुण नगराध्यक्ष बनले. १९९५मध्ये ते महापौर म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर ते खासदार होते. मनसेच्या स्थापनेनंतर २००९मध्ये ते पूर्व नाशिक मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.(प्रतिनिधी)