माजी आमदार नेताजी राजगडकर यांचे निधन

By Admin | Updated: July 18, 2014 14:42 IST2014-07-18T14:42:42+5:302014-07-18T14:42:55+5:30

राळेगावचे माजी आमदार नेताजी राजगडकर यांचे आज नागपुरात निधन झाले. गेले काही दिवस नेताजींची प्रकृती खालावली होती.

Former MLA Netaji Rajgadkar dies | माजी आमदार नेताजी राजगडकर यांचे निधन

माजी आमदार नेताजी राजगडकर यांचे निधन

नागपूर : राळेगावचे माजी आमदार नेताजी राजगडकर यांचे आज नागपुरात निधन झाले. गेले काही दिवस नेताजींची प्रकृती खालावली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला. त्यामुळे ऑरेंज सिटी रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले. 

तब्बल चार महिन्यानंतर त्यांना रुग्णालयतून सुटी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. ते यातून पूर्णपणे सावरतील असा विश्‍वास त्यांच्या चाहत्यांना असतानाच त्यांची प्राणज्योत सकाळी ९. ३0 वाजता मालविली. ही दु:खदायक बातमी कळताच वर्धा मार्गावरील स्नेहनगर येथील त्यांच्या निवासस्थानी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या घरी धाव घेतली. 
नेताजींचा जन्म १५ जानेवारी १९५0 साली यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील मानकी या छोट्याशा गावात झाला. वणीच्या जनता विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर लोकमान्य टिळक महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वणीच्या महाविद्यालयातून ते पहिले मेरीट आले होते. 
 

Web Title: Former MLA Netaji Rajgadkar dies