माजी आमदार ढोबळेंवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: March 3, 2015 02:17 IST2015-03-03T02:17:46+5:302015-03-03T02:17:46+5:30
मोहोळचे माजी आ़ लक्ष्मणराव ढोबळे व त्यांचे पुत्र अभिजित यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

माजी आमदार ढोबळेंवर गुन्हा दाखल
मोहोळ : आ़ रमेश कदम यांच्या स्वीय साहायकाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मोहोळचे माजी आ़ लक्ष्मणराव ढोबळे व त्यांचे पुत्र अभिजित यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वाघोली येथील महात्मा फुले सूतगिरणीच्या निवडणुकीची सोमवारी अर्ज छाननी होती़ या वेळी आ़ कदम यांचे स्वीय साहायक विजय रामकृष्ण कसबे तहसील कार्यालयात उपस्थित होते़ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप घेत कसबे यांना जाण्यास सांगितले़ त्यामुळे कसबे केबिनच्या बाहेर आल्यावर ‘तू आमदाराचे काम करतोस का,’ असे म्हणत अभिजित ढोबळे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर लक्ष्मणराव ढोबळे यांनी त्यांच्या श्रीमुखात भडकावली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी विजय कसबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे़