शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 15:09 IST

Harshvardhan Jadhav: बीआरएस पक्षाचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

बीआरएस पक्षाचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. दिल्लीत गेले असताना हर्षवर्धन जाधव यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. 

शिवसेना, मनसे या पक्षांमध्ये काम केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी हल्लीच तेलंगाणातील के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, काही कामानिमित्त हर्षवर्धन जाधव हे दिल्लीला गेले होते. तिथे ते नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी गेले असताना, नितीन गडकरी यांच्या निवास्थानीच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तपासणी केल्यावर हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे समोर आले.  हर्षवर्धज जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रकृतीची माहिती दिली आहे. त्यात ते म्हणाले की, मला बहुतेक हृदयविकाराचा झटका आला आहे. नितीन गडकरी यांच्या घरी असताना मला हृदयविकाराचा झटका आला. आता मला रुग्णालयात घेऊन जात आहेत. माझी आधी अँजियोप्लास्टी झालेली आहे. भारत माता की जय, देशाची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या. कन्नड मतदारसंघाची काळजी घ्या. वाचलो तर पुन्हा भेटू, असं आवाहन त्यांनी या व्हिडीओतून केलं आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीdelhiदिल्ली