माजी आमदार भास्करराव शिंदे यांचे निधन
By Admin | Updated: December 3, 2014 03:26 IST2014-12-03T03:26:14+5:302014-12-03T03:26:14+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भास्करराव ज्ञानोबा शिंदे (८१) यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.

माजी आमदार भास्करराव शिंदे यांचे निधन
मलकापूर (जि. सातारा) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भास्करराव ज्ञानोबा शिंदे (८१) यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. मलकापूरचे विद्यमान उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचे ते वडील होत. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोमवारी रात्रीपासून त्यांच्यावर कोल्हापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
भास्करराव शिंदे हे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पहिल्या महिला प्रदेशाध्यक्षा प्रेमलाकाकी चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री आनंदराव चव्हाण यांचे निष्ठावंत होते. स्वातंत्र्य लढा व गोवा मुक्ती संग्रामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. (प्रतिनिधी)