माजी मंत्री दौलतराव अहेर यांचे निधन
By Admin | Updated: January 20, 2016 03:31 IST2016-01-20T03:31:30+5:302016-01-20T03:31:30+5:30
माजी आरोग्यमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. दौलतराव सोनूजी अहेर (७३) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी पहाटे नाशिकमध्ये निधन झाले. देवळा तालुक्यातील दौलतनगर या मूळगावी

माजी मंत्री दौलतराव अहेर यांचे निधन
नाशिक : माजी आरोग्यमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. दौलतराव सोनूजी अहेर (७३) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी पहाटे नाशिकमध्ये निधन झाले. देवळा तालुक्यातील दौलतनगर या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे आदी या वेळी उपस्थित होते. अहेर यांच्या पश्चात पत्नी अलका, मुलगा आमदार डॉ. राहुल, कन्या राखी, रीना असा परिवार आहे.