शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचं पुण्यात निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 11:54 IST

P. B. Sawant यांनी मुंबई विद्यापीठातून घेतली होती कायद्याची पदवी

ठळक मुद्देते ९१ वर्षांचे होते. P. B. Sawant यांनी मुंबई विद्यापीठातून घेतली होती कायद्याची पदवी

माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचं पुण्यात निधन झालं. त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. पुण्यातील बाणेर येथे मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुण्यातील पहिली एल्गार परिषद ही पी.बी.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. पी.बी.सावंत यांचं आज (सोमवार) सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती अशी सावंत यांची ओळख होती. ३० जून १९३० रोजी पी.बी. सावंत यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यानंतर सावंत यांनी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सराव सुरू केला. १९७३ मध्ये सावंत यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी १९८२ मध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची चौकशीही केली. त्यानंतर १९८९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. १९९५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.२००३ मध्ये राज्य सरकारमधील तत्कालिन मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांच्या चौकशीसाठी एक समितीही स्थापन करण्यात आली होती. पी.बी. सावंत हे त्या समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी २३ फेब्रुवारी २००५ मध्ये आपला अहवाल सादर केला होता. त्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाचील आणि सुरेश जैन यांच्या आरोप ठेवण्यात आले होते. तर विजयकुमार गावित हे दोषमुक्त असल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर नवाब मलिक आणि सुरेश जैन यांनी राजीनामा दिला होता.न्यायामूर्ती पी. बी. सावंत सर, आमच्या आठवणीत तुम्ही नेहमी असाल. नवीन वकिलांना सामाजिक न्यायासाठीचा दृष्टीकोन समजावून सांगायला आमच्या सोबत नेहमी मार्गदर्शक म्हणून तुम्ही असायचे. न्यायिक सुधारणांसाठी आग्रही मत मांडणारे, आरक्षण विषयांवरील महत्त्वाच्या निर्णयांमधील एक सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून कधीही फोन केला की त्वरित कायद्याचा अनव्यार्थ बरोबर की चूक याबद्दल सांगणारा न्यायस्तंभ आता आमच्यात नाही. असीम सरोदे, मानवाधिकार कार्यकर्ते

टॅग्स :PuneपुणेHigh Courtउच्च न्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय