शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
3
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
4
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
5
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
6
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
7
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
8
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
9
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
10
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
11
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
12
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
13
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
14
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
15
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
16
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
17
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
18
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
19
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   

लोणारच्या विकासासाठी दोन नव्या समित्यांचे गठन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 19:20 IST

लोणार सरोवर परिसराचा पर्यटन दृष्ट्या विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारने दोन समित्यांची स्थापना केली आहे.

बुलडाणा: लोणार सरोवर परिसराचा पर्यटन दृष्ट्या विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारने दोन समित्यांची स्थापना केली आहे. यात अमरावतीचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समिती’ तसेच राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोणार सरोवर विकास आराखडा सनियंत्रण समिती’ या दोन समित्यांचा समावेश आहे.

लोणार सरोवराचा विकास करून त्याला पर्यटनाच्या नकाशावर अग्रस्थानी आणण्यासाठी या समित्या गठीत केल्या आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून खा. प्रतापराव जाधव आणि आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले आहे.लोणार सरोवर हा जागतिक वारसा संवर्धन, जतन करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने वेळोवेळी केलेल्या निरीक्षण व सूचनांनुसार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देश नुसार या समित्यांचे गठण करण्यात आले. जगविख्यात ठेवा असलेला लोणार सरोवर परिसर पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी लोणार दौरा केला होता. त्यानंतर विकास निधी आणि त्यादृष्टीने नव्याने समित्यांचे गठण करण्यात आले. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २४ फेब्रुवारी रोजीच अनुषंगीक आदेशही पारीत केला असल्याची माहिती खा. प्रतापराव जाधव यांनी दिली.

लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समितीमध्ये अमरावती विभागीय आयुक्त हे अध्यक्ष असून बुलडाणा जिल्हाधिकारी हे सदस्य सचिव आहेत. यासोबतच प्रधान मुख्य वनसंरक्षक (नागपूर), मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (अमरावती), जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता (अमरावती), भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक (नागपूर), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक (अमरावती), न्यायालयीन मित्र, उपविभागीय अधिकारी व लोणार पालिकेचे मुख्याधिकारी यात सदस्य म्हणून राहतील.

यासोबतच लोणार सरोवर विकास आराखडा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य सचिव हे काम पाहतील. या समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव वित्त, अपर मुख्य सचिव नियोजन, आराखड्याची संबंधित विभागाचे अप्पर मुख्य सचिव /प्रधान सचिव, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी बुलडाणा, लोणार पालिकेचे मुख्याधिकारी हे सदस्य राहतील. पर्यटन विभागाचे सहसचिव सदस्य हे समितीचे सचिव म्हणून काम पाहतील.

विकासासाठी कटिबद्ध - जाधवजागतिक आकर्षण असलेल्या लोणारला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. लोणार विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत असे खा. प्रतापराव जाधव म्हणाले.

टॅग्स :Lonarलोणारlonar sarovarलोणार सरोवरUddhav Thackerayउद्धव ठाकरे