शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दुरावा विसरा, एकजुटीने कामाला लागा, अमित शाह यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 20:56 IST

शिवसेना आणि भाजपा राज्य आणि केंद्रात एकत्र असले तरी त्यांच्यात तीव्र मनभेद निर्माण झाले होते. मात्र आज अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गळाभेट घेत युतीमधील दुरावा संपुष्टात आणला.

मुंबई - गेल्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटली होती. त्यानंतर दोन्ही पक्ष राज्य आणि केंद्रात एकत्र असले तरी त्यांच्यात तीव्र मनभेद निर्माण झाले होते. मात्र आज अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्षअमित शहा यांनी गळाभेट घेत युतीमधील दुरावा संपुष्टात आणला. यावेळी शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती व्हावी, अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे. शिवसेना हा भाजपाचा सर्वात जुना मित्र आहे. काही कारणांमुळे आपल्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र तो दुरावा आज या क्षणापासून विसरा आणि एकजूट होऊन कामाला लागा, असे आवाहन अमित शहा यांनी केले. शिवसेना आणि भाजपाची युती निश्चित झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाध्यक्ष अमित शाह नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी अमित शहा म्हणाले की''शिवसेना आणि भाजपा युती व्हावी अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली आहे. शिवसेना हा भारतीय जनता पक्षाचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे. गेल्या काही काळात आमच्यात मतभेद होऊन काही दुरावा निर्माण झाला होता. मात्र जो काही दुरावा होता तो आज इथे संपुष्टात आणा.'' अमित शहा पुढे म्हणाले की, ''भाजपा आणि शिवसेनेमधील युती ही केवळ राजकीय नाही तर वैचारिक पार्श्वभूमीवर आधारलेली आहे. गेल्या पाच वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात एनडीएचे सरकार आहे. त्यात शिवसेना सहभागी आहे. केंद्रात मोदींनी चांगले काम केले आहे. तर राज्यात  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चांगले काम केले आहे. आता दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आणि कार्यकर्ते एकजूट होऊन लढतील आणि विजयी होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाShiv Senaशिवसेना