मराठी चित्रपटसृष्टीला अनंत माने यांचा विसर

By Admin | Updated: March 22, 2015 01:05 IST2015-03-22T01:05:09+5:302015-03-22T01:05:09+5:30

तमाशा चित्रपटांचा दिग्दर्शक अशी हेटाळणी जिवंतपणी वाट्याला आलेले अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात कलानगरीतील कलावंतानाही त्यांचा विसर पडला आहे.

Forget the Marathi film industry's infinite Mane | मराठी चित्रपटसृष्टीला अनंत माने यांचा विसर

मराठी चित्रपटसृष्टीला अनंत माने यांचा विसर

संदीप आडनाईक ल्ल कोल्हापूर
तमाशा चित्रपटांचा दिग्दर्शक अशी हेटाळणी जिवंतपणी वाट्याला आलेले अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात कलानगरीतील कलावंतानाही त्यांचा विसर पडला आहे. चित्रपटसृष्टीतील ६५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल ५७ चित्रपट दिग्दर्शित केले.
संकलण, छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, प्रसंगी तोंडाला रंग फासून ते मॉबसिनही करायचे. अभिनय असो की कथा-पटकथा लेखन, दिग्दर्शन किंवा निर्मिती आणि वितरण या सर्व क्षेत्रात त्यांनी कामाचा ठसा उमटवला.
मराठी चित्रपटांच्या पडत्या काळात माने यांनी ‘सांगत्ये ऐका’सारखा तमाशाप्रधान चित्रपट बनविला आणि पुण्यात त्याने तब्बल १३१ आठवडे मुक्काम ठोकला. अजूनही हा विक्रम मराठी चित्रपटाने मोडलेला नाही. माने यांनी मायभूमी कोल्हापुरात चित्रपटनिर्मिती केली. इतकेच नव्हे तर कलाकार, तंत्रज्ञही येथील घेण्याचा अट्टहास धरला.
आज जे काही कलावंत त्यांच्यामुळे शिखरावर आहेत, त्यांनाही माने यांचा विसर पडला आहे. व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यासारख्या कलावंतांचा यथोचित सन्मान सरकारदरबारी झाला. मात्र आजची परिस्थिती पालटली आहे. मराठी चित्रपटांना संजिवनी देणाऱ्या कलावंतांचा सन्मान करावा, असे आता सरकार दरबारी वाटत नाही. कोल्हापूर चित्रनगरीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या माने यांच्यासारख्या द्रष्ट्या कलावंताची कोल्हापुरात साधी नावनिशाणीही नाही. त्यांच्या नावाने येथे एखादे सभागृहही नाही. कोल्हापुरातील एका रस्त्याला आणि चौकाला महानगरपालिकेने त्यांचे नाव दिले होते, पण आज त्याचा ठावठिकाणा शोधावा लागतो. माने यांनी तमाशाप्रधान चित्रपटांबरोबरच ‘मानिनी’, ‘सुशीला’सारखे सामाजिक आशयाचे लोकनाट्याला सन्मान देणारे चित्रपटही दिले. राज्य सरकार त्यांच्या नावाचा पुरस्कार दरवर्षी देते, एवढीच समाधानाची बाब. माने यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी अपेक्षा चित्रपटरसिक व्यक्त करीत आहेत.

चित्रपट रसिकांची अपेक्षा
च्कोल्हापूरच्या चित्रनगरीला ‘अनंत माने’ यांचे नाव द्यावे.
च्अनंत माने यांच्या चित्रपटांचा महोत्सव भरवावा.
च्शिवाजी विद्यापीठात चित्रपट अभ्यासकांसाठी स्वतंत्र दालन उभारून त्याला अनंत माने यांचे नाव द्यावे.
फलकच गायब
अनंत माने यांचे नाव लक्ष्मीपुरीतील एका चौकाला दिले होते. तत्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते. परंतु दुर्दैवाने त्यांच्या नावाचा फलकच आता गायब झाला आहे.

Web Title: Forget the Marathi film industry's infinite Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.