शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

झाले गेले विसरा, एकत्रितपणे निवडणुकीच्या कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 6:14 AM

मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे : भाजपा-शिवसेना आमदारांना दिले आदेश

मुंबई : साडेचार वर्षांत भाजपा शिवसेनेत काहीशी कटुता होती, पण आता ती उगाळत बसण्याचे काहीही कारण नाही. आपण एकत्र आलो आहोत. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका जिंकण्याचा निर्धार करून एकत्रितपणे फिरा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आमदारांना दिला.

भाजपा - शिवसेना आमदारांचे स्नेहभोजन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सोमवारी रात्री झाले. मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपा- शिवसेनेचे बहुतेक मंत्री, आमदार यावेळी उपस्थित होते.

भाजपा शिवसेनेची युती आजची नाही ती पंचवीस वर्षांपासूनची आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी युती होणे अत्यंत आवश्यक होते. युती झाली नसती, तर त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला झाला असता. इतकी वर्षे ज्यांच्या विरोधात आपण रान उठवले त्यांना आपल्या बेकीचा फायदा मिळवून द्यायचा नाही हा विचार करूनच आम्ही एकत्र आलो आहोत. वेगवेगळे लढलो असतो तर आपण पुन्हा पंधरा वर्षे मागे गेलो असतो, असे मुख्यमंत्री आणि उद्धव यांनी सांगितले.

युतीचा निर्णय आता झालेला आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने एकत्रितपणे बसून हा निर्णय घेतला आहे पण, निवडणुकीच्या मैदानात त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. युती झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास वाढला आहे.

अगदी काही ठिकाणी थोड्याफार कुरबुरी आहेत पण, लोकसभा निवडणूक लक्षात घेता त्या आता होता कामा नयेत. भाजपा आणि शिवसेनेचे आमदार, स्थानिक नेते या सगळ्यांनी एकत्रितपणे फिरण्यास सुरुवात करा, असे फडणवीस आणि ठाकरे यांनी सांगितले.दोन्ही पक्षांचे आमदार -खासदार, पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी यांच्यात गेली साडेचार वर्षे एकोपा होताच. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंधही अत्यंत स्नेहाचे राहिले पण, काही मुद्द्यांवर मतभेद होते आणि त्यातून तणावाचे चित्र समोर आले. आता त्यावरदेखील आमच्यात चर्चा होऊन मतभेदाचे मुद्दे मार्गी लागले आहेत. युती झाल्यामुळे तुमचे चेहरेदेखील खुलले आहेत. आता तुम्ही जिल्ह्याजिल्ह्यात एकत्रित बैठका घेऊन युतीची ताकद दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा