रानपिंगळ्याचा विसर
By Admin | Updated: July 10, 2014 01:24 IST2014-07-10T01:24:52+5:302014-07-10T01:24:52+5:30
खान्देशची ओळख असलेल्या रानपिंगळ्याचा (घुबड) वन विभागाला विसर पडला आहे.

रानपिंगळ्याचा विसर
जितेंद्र विसपुते - जळगाव
खान्देशची ओळख असलेल्या रानपिंगळ्याचा (घुबड) वन विभागाला विसर पडला आहे. वनक्षेत्रत वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे रानपिंगळ्याचा अधिवास धोक्यात आला आह़े त्याचे अस्तित्व आजही खान्देशात असून त्यासाठी शोधमोहीम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे पक्षी अभ्यासकांचे म्हणणो आह़े
खान्देशातील जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील वनक्षेत्रत हा पक्षी आढळून आल्याची नोंद आह़े मेळघाटात रानपिंगळा मोठय़ा प्रमाणात आढळतो. वनांमधील मानवी अतिक्रमण, साग आणि आंब्यांच्या झाडांची मोठय़ा प्रमाणात झालेली तोड यामुळे हा पक्षी दुर्मीळ झाला असल्याचे वन्यजीवप्रेमी अभय उजागरे यांनी सांगितल़े अतिदुर्मीळ व संकटग्रस्त प्रजाती म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी 1995 मध्ये यावल अभयारण्यात अभय उजागरे यांना आढळून आला होता़ त्याची अधिकृत नोंद नाही़ त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा वनक्षेत्रत 1997 मध्ये पुन्हा हा पक्षी डॉ़ पामेला रासमोसेन यांनी शोधून काढला़ विशेष म्हणजे ही नोंद 113 वर्षानंतरची होती़ तसेच 2क्क्4 मध्ये हा पक्षी चोपडा तालुक्यातील देवङिारी वनक्षेत्रत पक्षी अभ्यासक जयंत वढतकर यांना आढळून आला. जंगलाचे स्थानिकांकडून शोषण होत असताना देखील प्रशासन सुस्त आह़े, असे पक्षी अभ्यासक गणोश सोनार यांचे म्हणणो आह़े महाराष्ट्राला जगभर ख्याती मिळवून देणा:या या पक्षाचा अधिवास आणि संख्या वाढावी यासाठी वन विभागाने तातडीने पावले उचलावत़ जनजागृती मोहीम हाती घेऊन त्यांच्या अधिवासाचा शोध घ्यावा, अशी सूचना पर्यावरणवाद्यांकडून करण्यात येत आह़े अधिवास क्षेत्र धोक्यात आल्याने हा पक्षी मेळघाटकडे स्थलांतरित होत असल्याची शक्यता पक्षी अभ्यासकांकडून वर्तविली जात आह़े
च्अन्न : कीटक, पाली आणि सरडे
च्दिवसा व रात्रीही शिकार करणारा एकमेव पक्षी
च्वर्षभरात एकदाच अंडी घालतो़
च्उंची 23 सेमी़ शेपटीचे टोक पांढ:या रंगाचे
च्पंखांवर राखाडी व पांढ:या रंगांचे ठिपके