अडीचशे एकरावर होणार वनीकरण

By Admin | Updated: July 16, 2014 03:14 IST2014-07-16T03:14:59+5:302014-07-16T03:14:59+5:30

राज्यातील ओसाड झालेल्या वन क्षेत्रावर पुन्हा वनराई फुलवून धरतीस हिरवा शालू नेसविण्यासाठी महसूल व वन खात्याने आता खासगी क्षेत्राची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे़

Forestry will be on two and a half acres | अडीचशे एकरावर होणार वनीकरण

अडीचशे एकरावर होणार वनीकरण

नारायण जाधव, ठाणे
राज्यातील ओसाड झालेल्या वन क्षेत्रावर पुन्हा वनराई फुलवून धरतीस हिरवा शालू नेसविण्यासाठी महसूल व वन खात्याने आता खासगी क्षेत्राची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे़ याच अंतर्गत ठाणे जिल्'ातील पालघर तालुक्यातील तारापूर एमआयडीसीतील आरती ड्रग्ज लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आणि सुधा प्रतिष्ठान, सूर्या मासवण या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने धुकटण गावातील १०० हेक्टर अर्थात अडिचशे एकर संरक्षित वन क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे़
याबाबतच्या प्रस्तावात राज्याच्या महसूल आणि वन खात्याने गुरूवारी मान्यता दिली आहे़ याबाबत तिन्ही संस्थात त्रिपक्षीय करार करून काम करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत़
यात उपरोक्त क्षेत्रात वृक्ष लागवड करून ७ वर्षे त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आरती ड्रग्जवर सोपविण्यात आली आहे़ याचा संपूर्ण खर्च आरती ड्रग्जनेच करावयाचा असून त्यांच्याकडून करण्यात येणारी वृक्ष लागवड वन विभागाच्या अधिकाऱ्यांची देखरेखीखाली करावयाची आहे़
तसेच जागेवर आरती ड्रग्ज किंवा सूर्या मासवण यांची कोणतीही मालकी राहणार नाही़ तसेच करारनाम्याचा भंग झाल्यास संबधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार नागपूर येथील मुख्य वन संरक्षकांना देण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Forestry will be on two and a half acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.