वनश्री करणार झाडांचे जतन

By Admin | Updated: July 2, 2016 03:33 IST2016-07-02T03:33:50+5:302016-07-02T03:33:50+5:30

वनश्री फाउंडेशनच्या वतीने इमामीचे महाव्यवस्थापक एम कुमार, उद्योगपती मनुभाई मेहता, वास्तू शिल्प चे निशांत पाटील, अजय मांडविया, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

Forestry Tree Preserve | वनश्री करणार झाडांचे जतन

वनश्री करणार झाडांचे जतन


पालघर : आज वृक्ष दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन कोटी वृक्षलागवडीचा संकल्प शासनाने जाहीर केल्यानंतर पर्यावरण संवर्धनाच्या या स्तुत्य उपक्र मात आपलाही सहभाग असावा यासाठी पालघरमधील पडघे-उमरोली येथे वनश्री फाउंडेशनच्या वतीने इमामीचे महाव्यवस्थापक एम कुमार, उद्योगपती मनुभाई मेहता, वास्तू शिल्प चे निशांत पाटील, अजय मांडविया, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी १० हजार झाडे लावण्याबरोबरच त्यांचे जतन करण्याचे कामही वनश्री फाउंडेशन करणार असल्याचे सांगण्यात आले.
आज या सहभागातून १ हजार वृक्ष लावण्यात आली तर आठवडाभरात ५ हजार वृक्ष लावण्यात येऊन त्याची जोपासनाही करण्यात येणार असल्याचे सांबरे यांनी सांगितले. हा कार्यक्रम शासकीया असला तरी ग्रामस्थांनी यात दाखविलेला सहभाग लक्षणिय होता.
पालघरमध्ये पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर नगर परिषद, प्रांताधिकार, तहसीलदार, पंचायत समितीच्या वतीने विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले. (प्रतिनिधी)
>विक्रमगडसह परिसरात जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवक निलेश सांबरे हे उपेक्षित व आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांपैकी सीबीएससीचे ३०० विद्यार्थी, पाचवी ते दहावी इयत्तेचे ६०० विद्यार्थी, अंध आणि अपंग ५० विद्यार्थ्यांच्या विनामूल्य शिक्षणाचे शिवधनुष्य मागील अनेक वर्षांपासून पेलत आहेत.

Web Title: Forestry Tree Preserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.