शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शिवनेरी किल्ल्यावर वनाधिकाऱ्यांची मद्यपार्टी; दोन जण निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 08:51 IST

किल्ल्यावर काही अनुचित प्रकार किंवा मद्यपानाच्या घटना घडू नयेत, यासाठी वनकर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या देखभालीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या वनाधिकाऱ्यांकडूनच किल्ल्यावर मद्यपार्टी करण्यात आल्याचा संतापनजक प्रकार उघडकीला आला आहे. सोमवारी साजऱ्या होत असलेल्या शिवजयंती उत्सवासाठी काल रात्री काही शिवप्रेमी गडावर आले असताना त्यांच्या दृष्टीस हा प्रकार पडला. त्यानंतर या तरुणांनी मद्यधुंद अवस्थेतील या कर्मचाऱ्यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले. तसेच त्यांना पकडून जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले. या व्हिडिओच्याआधारे पोलिसांनी मद्यपान केलेल्या वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. यापैकी प्रकाश जाधव आणि संतोष नवगिर्हे या दोन वनाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. किल्ल्यावर काही अनुचित प्रकार किंवा मद्यपानाच्या घटना घडू नयेत, यासाठी वनकर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, या कर्मचाऱ्यांकडूनच सगळ्याला हरताळ फासण्यात आल्याने आता किल्ल्याच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर सुरुवातीला पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यात टाळाटाळ करण्यात येत होती. मात्र, शिवप्रेमींनी या प्रकाराची ध्वनीचित्रफीत दाखवल्यानंतर पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला. मात्र, या प्रकारामुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंती