वनविभाग तेलंगणात ‘जय’चा शोध घेणार

By Admin | Updated: December 28, 2016 01:19 IST2016-12-28T01:19:25+5:302016-12-28T01:19:25+5:30

तेलंगणमधील पैनगंगेच्या जंगलात दिसून आलेला वाघ हा ‘जय’ च आहे, की नाही. याचा शोधण्यासाठी महाराष्ट्राचा वन विभाग तेथील जंगलात कॅमेरा ट्रॅप लावणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

The forest department will conduct 'Jai' in Telangana | वनविभाग तेलंगणात ‘जय’चा शोध घेणार

वनविभाग तेलंगणात ‘जय’चा शोध घेणार

नागपूर : तेलंगणमधील पैनगंगेच्या जंगलात दिसून आलेला वाघ हा ‘जय’ च आहे, की नाही. याचा शोधण्यासाठी महाराष्ट्राचा वन विभाग तेथील जंगलात कॅमेरा ट्रॅप लावणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
सोमवारी पैनगंगेच्या जंगलात ‘जय’ दिसल्याचे वनविभागाला समजले. त्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट तेलंगणचे वनमंत्री जोगारामन्ना यांच्याशी चर्चा केली. तसेच महाराष्ट्रातील वन अधिकाऱ्यांना तातडीने तेलंगणमध्ये जाऊन ‘त्या’ वाघाचे छायाचित्र आणि व्हिडिओ क्लिप आणण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार वन विभाग कामाला लागला असून, लवकरच पैनगंगेच्या जंगलात कॅमेरा ट्रॅप सज्ज केले जाणार आहेत. ‘जय’ हा मागील आठ महिन्यांपूर्वी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून अचानक गायब झाला आहे. तेव्हापासून नागपूर वन विभाग त्याचा युद्धपातळीवर शोध घेत आहे. त्याचवेळी ‘जय’ सोबत काही घातपात तर झाला नाही ना, या शंकेने राज्य शासनाने प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)

- जय १९ मे रोजी पवनी परिसरातील जंगलातून गायब झाला होता. यानंतर वन विभागाने सर्व व्याघ्र प्रकल्पात रेड अलर्ट जारी करून त्याचा युद्घपातळीवर शोध घेतला. त्यासाठी वन विभागाने २२४ वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ५६ पथके सज्ज करून ते सर्वत्र रवाना केली होती.

Web Title: The forest department will conduct 'Jai' in Telangana