परदेशी भाजीपाला पिकतो लाटवडे गावात

By Admin | Updated: December 9, 2014 00:26 IST2014-12-09T00:02:56+5:302014-12-09T00:26:54+5:30

बेझील चहापत्तीचाही प्रयोगही यशस्वी : ६५ गुंठ्यांत वर्षाच्या आत साडेआठ लाखांचा नफा अपेक्षित

Foreign vegetables in Pakotto Latvade village | परदेशी भाजीपाला पिकतो लाटवडे गावात

परदेशी भाजीपाला पिकतो लाटवडे गावात

आयुब मुल्ला- खोची -उसाच्या शेतीला फाटा देत परदेशी फळे-भाजीपाल्यांचे उत्पादन लाभदायक ठरू शकते हे सिद्ध केले आहे लाटवडे येथील शेतकरी विष्णुपंत शामराव पाटील यांनी. लाल-पिवळी ढबू मिरची, पिवळी काकडी, तांबडा-हिरवा कोबी आणि बेझील चहापत्ती यांचा यशस्वी प्रयोग माळरानाच्या शेतीत करून तो पंचतारांकित हॉटेलमध्ये खवय्यासाठी पाठविला जातो. अवघ्या ६५ गुंठ्यांत चार पिके घेताना त्यातून सरासरी २५ लाखांचे उत्पन्न नऊ महिन्यांत घेण्याचे उद्दिष्ट आहे. तर त्यातून वर्षात सरासरी सुमारे साडेआठ लाख रुपयांचा नफा अपेक्षीत आहे.
हातकणंगले तालुक्यातील लाटवडेचे सरपंच असणारे विष्णुपंत पाटील शेतीत सतत भाजीपाला तसेच अन्य पिकांचे प्रयोग करतात, परंतु सध्याच्या भाजीपाल्याने त्यांचे अर्थकारणच बदलत चालले आहे. पूर्वी या सर्व क्षेत्रात ऊस होता. सत्तर टन उत्पादन निघत होते; पण वर्षभरापूर्वी त्यांनी निर्णय बदलला.

परदेशी भाजीपाल्यांचे उत्पादन अर्थकारण बदलणारे
दोन वर्षांपूर्वीपेक्षा नवीन उत्पन्नात चारपटीने वाढ
दूध, साखर न वापरता बेझील चहा गुळामुळे लागतो स्वादिष्ट
कुटुंबातील सर्वांचे हात
शेतीच्या कामात मग्न
लाल-पिवळी ढबू मिरची, पिवळी काकडी, तांबडा-हिरवा कोबी आणि बेझील चहापत्ती यांचा प्रयोग माळरानाच्या शेतीत यशस्वी


१०० दिवसांत आठ टन ३०० किलो मालाचे उत्पादन
राष्ट्रीय फलोत्पादन विभागांतर्गत ३० टक्के अनुदानावर २० गुंठ्यांत पॉली हाऊसची उभारणी केली. त्यामध्ये पिवळा-लाल रंग धारण करणारी ढबू मिरचीची रोपेही लावली. झिगझॅग पद्धतीने एक फूट अंतरावर साडेसहा हजार रोपांचे तरू लावले. त्यास तीन आठवड्यांनी फलधारणा सुरू झाली. ७५ दिवसांनी फुले दिसली. तत्काळ ढबूही तयार झाली. १०० दिवसांत आठ टन ३०० किलोंचे उत्पादन निघाले. ते मुंबईच्या बाजारपेठेतही पाठविले. त्यातून पावणेपाच लाखांचे उत्पन्न मिळाले. अजून सहा महिन्यांत १५ लाखांचे उत्पादन निघेल. यासाठी एकूण पावणेदोन लाखांपर्यंत खर्च आहे. अनुदान रूपाने साडेसात लाख रुपये प्राप्त झाले. यातून निव्वळ नफा चार लाख इतका मिळेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली.

संपूर्ण शेतीला ड्रीपद्वारे पाणी, खते दिली जातात. यापूर्वी याच क्षेत्रात ऊस ७० टन म्हणजे, दीड लाखाचे उत्पन्न मिळायचे; पण नव्या तंत्राच्या शेतीने उत्साह वाढण्याबरोबरच अर्थकारणही सुधारले. आणखी नवे प्रयोग शेतीत करण्याचा मानस आहे. -विष्णुपंत पाटील



आता कोबी काढण्यास सुरुवात होईल. कोबीचे तरू घरीच तयार करून २० हजार रोपे लावली. बाजारपेठेतील दराचा अंदाज बांधला तर तीन लाखांचे उत्पन्न मिळेल. काकडी तोडण्यासही सुरुवात होईल. यातून ४० हजारांचे उत्पन्न मिळेल. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे हॉटेलमध्ये ‘हर्बल टी’साठीची चहापत्ती दहा गुंठ्यांत आहे. याचीही दहा हजार रोपे घरीच तयार केली. याचा तोडा महिन्याने सुरू झाला. तीन महिन्यांत ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. अजून पाच महिन्यांत दीड लाखाचे उत्पन्न मिळेल.


या शेतीला सलग्न इतर दोन परदेशी भाज्या व चहापत्तीची शेती केली आहे. ढबू मिरचीसोबतच याची खरेदी व्यापारी करतात. म्हणून कमी क्षेत्रातसुद्धा जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी त्यांनी पाच गुंठ्यांत झुकेणी वाळके (पिवळी-हिरवी), तीस गुंठ्यांतच निम्मा चायनीज व निम्मा लाल कोबी लावला आहे, तर दहा गुंठ्यांत बेझील चहापत्ती लावली आहे.

आता कोबी काढण्यास सुरुवात होईल. कोबीचे तरू घरीच तयार करून २० हजार रोपे लावली. बाजारपेठेतील दराचा अंदाज बांधला तर तीन लाखांचे उत्पन्न मिळेल. काकडी तोडण्यासही सुरुवात होईल. यातून ४० हजारांचे उत्पन्न मिळेल. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे हॉटेलमध्ये ‘हर्बल टी’साठीची चहापत्ती दहा गुंठ्यांत आहे. याचीही दहा हजार रोपे घरीच तयार केली. याचा तोडा महिन्याने सुरू झाला. तीन महिन्यांत ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. अजून पाच महिन्यांत दीड लाखाचे उत्पन्न मिळेल.

Web Title: Foreign vegetables in Pakotto Latvade village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.