शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती, इतिहासाकडे खुल्या नजरेने पाहावे, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 08:50 IST

S. Jaishankar : ‘स्वातंत्र्यानंतर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचेच कल्चर कॉपी केले आहे. परंतु, भारताने आपली संस्कृती, आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पाहायला हवे,’ असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले.

पुणे -  ‘स्वातंत्र्यानंतर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचेच कल्चर कॉपी केले आहे. परंतु, भारताने आपली संस्कृती, आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पाहायला हवे,’ असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले. येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन एस. जयशंकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी देशाच्या धोरणात्मक संस्कृती-जागतिक आणि प्रादेशिक आव्हानांबाबत विचार मांडले.

‘आपण यापूर्वी न स्वीकारलेले वेगवेगळे मार्ग स्वीकारले पाहिजेत. भूतकाळात पर्याय आणि विचार प्रक्रिया अस्तित्वात होती. पण आता आपल्या स्वतःच्या नोंदींचे गंभीरपणे परीक्षण करणे आवश्यक आहे. अनेकविध संकल्पना आपल्या संस्कृतीत आहेत, पण आपण त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे,’ असेही एस. जयशंकर म्हणाले. 

  डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, ‘परराष्ट्र धोरणासाठी सांस्कृतिक देवाणघेवाण महत्त्वाची आहे. यात पुण्यासह सिम्बायोसिस महत्त्वाचे योगदान देत आहे.’ यावेळी कुलगुरू डॉ. रामकृष्ण रमण आणि डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते.

परराष्ट्रीय धोरण अनियंत्रित घटकांवर अवलंबूनएस. जयशंकर म्हणाले, ‘परराष्ट्रीय धोरण हे अनेक अनियंत्रित घटकांवर अवलंबून असते म्हणून आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कोणत्याही देशाला कालबद्ध तसेच योजनाबद्ध असे आखीव धोरण ठरविणे शक्य नसते. या दृष्टीतून परराष्ट्रीय धोरणाची तुलना स्वयंचलित जहाजापेक्षा नौकानयनाशी करता येण्यासारखी आहे. अर्थात, परराष्ट्रीय धोरण परिणामकारक होण्यासाठी त्यात एकसूत्रता आणि लवचिकपणा हे दोन्ही गुण आवश्यक असतात.’

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरsymbiosisसिंबायोसिसPuneपुणे