शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 10:54 IST

जिल्हा प्रशासनाने पालकांचे समुपदेशन करून गरज पडल्यास थोडी जोर जबरदस्ती करून ती मुले शाळेत गेलीच पाहिजेत, अशी भूमिका घ्यायला हवी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केले.

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क 

पालघर: सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव होत आहेत, मात्र माझ्यासमोर चिंता आहे ती स्थलांतरित कातकरी कुटुंबातील शाळाबाह्य मुलांची. स्थलांतर करणारी जी आमची मुले आहेत, त्यांचे शिक्षण हे मोठे चॅलेंज आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात शाळाही सुरू केल्या असून, जिल्हा प्रशासनाने पालकांचे समुपदेशन करून गरज पडल्यास थोडी जोर जबरदस्ती करून ती मुले शाळेत गेलीच पाहिजेत, अशी भूमिका घ्यायला हवी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्यासाठी सुरू केलेली ‘धरती आबा’ लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ पालघर जिल्ह्यात मनोर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पोलिस अधीक्षक यतिश देशमुख उपस्थित होते.

वाढवणमधील रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देणार पालघरमध्ये वाढवण बंदर उभे राहिल्यानंतर जिल्ह्यात विकासात्मक परिवर्तन होणार आहे. बंदरामुळे देश भविष्यात सागरी शक्ती म्हणून पुढे येणार आहे. यामुळे जागतिक व्यापारात भारताची भागीदारी वाढेल. स्थानिक तरुणांना येथील रोजगारात प्राधान्य देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.    वनपट्टे १५ ऑगस्टपर्यंत निकाली काढा जिल्ह्यात आजही ७ ते ८ हजार वनपट्टे वाटप करण्याचे काम शिल्लक आहे. हे वनपट्टे १५ ऑगस्टपर्यंत निकाली काढण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

सुसंवाद ही समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली सोमवारी विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर तालुक्यातील दुर्वेस शाळेत सोमवारी उपस्थित राहून येथील विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप करून त्यांचे औपचारिक स्वागत केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांच्यातील सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई