शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

झारखंडाच्या संघावर फॉलोऑनची नामुश्की, सर्वबाद १७० धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 23:07 IST

दुसऱ्या डावात १ बाद ४७ : विजयासाठी महाराष्ट्राला नऊ बळींची गरज

नागोठणे : महाराष्ट्राच्या मुकेश चौधरी आणि डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव यांनी झारखंडाच्या फलंदाजाचे बळी मिळविल्याने झारखंडची सर्वबाद १७० अशी परिस्थिती केल्याने झारखंडवर फॉलोआॅनची नामुष्की ओढवली. तिसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसºया डावात झारखंड १ बाद ४७ धावांवर खेळत असून डावाच्या पराभवापासून वाचण्यासाठी झारखंड अजूनही २१७ धावांनी पिछाडीवर आहे. विजय मिळविण्यासाठी महाराष्ट्राला अजून नऊ बळी मिळविणे गरजेचे आहे. उद्या शेवटचा दिवस आहे.

रविवारी दुसºया दिवसाचा खेळ संपला तेंव्हा झारखंडची २ बाद २ अशी अवस्था होती. सोमवारी सकाळी सलामीवीर नाझीम आणि कर्णधार सौरभ तिवारी मैदानावर उतरले असता, संघाच्या २१ धावा फलकावर लागल्या असता नाझीम १३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर तिवारी याच्या जोडीला आलेल्या विराट सिंगने झुंज देत चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. संघाच्या १२० धावा झाल्या असताना विराट सिंग ४३ धावा काढून बाद झाला. याच धावसंख्येवर पाचवाही बळी गेल्याने ५ बाद १२० धावा अशी झारखंडची परिस्थिती झाली होती.

एका धावसंख्येची वाढ झाल्यावर सहावी विकेट १२१ वर पडली, तर एकाकी झुंज देत असलेला कर्णधार सौरभ तिवारी ६२ ची सातवी विकेट १३३ वर पडल्याने उर्वरित चार फलंदाजांनी ३७ धावांची भर टाकल्याने झारखंडचा पहिला डाव १७० धावांमध्ये संपुष्टात आला. यात सत्यजित बच्छावने ५, मुकेश चौधरी ३ आणि अझीम काझीने २ बळी घेतले. फॉलोआॅन मिळाल्याने दुसºया डावात खेळावयास आलेल्या कुमार देवव्रत याने संघाच्या २१ धावा झाल्या असताना बच्छावच्या गोलंदाजीवर मुकेश चौधरीच्या हातात झेल दिल्याने तो १० धावा काढून बाद झाला. तिसºया दिवसाचा खेळ संपला तेंव्हा मोहम्मद नाझीम २३ आणि उत्कर्ष सिंग १२ धावांवर खेळत आहेत. विजय मिळविण्यासाठी महाराष्ट्राला अजून नऊ बळी मिळविणे गरजेचे आहे.झारखंड (पहिला डाव)कुमार देवव्रत झे. नौशाद शेख गो. मुकेश चौधरी ०नाझीम झे. अझीम काझी गो. मुकेश चौधरी १३उत्कर्ष सिंग झे. विशांत मोरे गो. मुकेश चौधरी ०२सौरभ तिवारी झे. स्वप्नील गुगले गो. सत्यजित बच्छाव ६२विराट सिंग झे. मनोज इंगळे गो. सत्यजित बच्छाव ४३कुमार सुरज झे. गो. सत्यजित बच्छाव ०सुमित कुमार झे. यश क्षीरसागर गो. अझीम काझी ०अनुकूल रॉय झे. नौशाद शेख गो. सत्यजित बच्छाव ०९वरुण एरॉन पायचीत गो. अझीम काझी ०२अजय यादव झे. गुगले गो. सत्यजित बच्छाव २९राहुल शुक्ला नाबाद २