‘दुष्काळग्रस्त जनतेच्या समस्यांचा पाठपुरावा करा!’

By Admin | Updated: April 24, 2016 02:26 IST2016-04-24T02:26:41+5:302016-04-24T02:26:41+5:30

राज्यातील दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. या परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे

Follow the problems of the people of drought! | ‘दुष्काळग्रस्त जनतेच्या समस्यांचा पाठपुरावा करा!’

‘दुष्काळग्रस्त जनतेच्या समस्यांचा पाठपुरावा करा!’

मुंबई : राज्यातील दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. या परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे राहून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.
प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक शनिवारी सकाळी मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खा. चव्हाण होते. राज्यातील दुष्काळ हाच या बैठकीतील चर्चेचा प्रमुख मुद्दा होता. त्यांनी राज्याच्या विविध जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. आगामी निवडणुकीच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चाही झाली. प्रदेशाध्यक्षांनी जबाबदारी वाटपाच्या अनुषंगानेही पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Follow the problems of the people of drought!