शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

शिस्त पाळा, नाहीतर पुन्हा निर्बंध; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 11:41 IST

आधीच्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली, अनेकांचे रोजगार गेले. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कोरोनाचा सामना करण्याच्या दृष्टीने वर्तणूक अंगीकारणे आवश्यक आहे.

मुंबई : राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी  स्वत:हून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी संवाद साधला. रुग्णांमध्ये फ्लू सदृश्य लक्षणे आढळल्यास  तत्काळ आरटीपीसीआर करा, टेस्टिंगची संख्या, लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 

आधीच्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली, अनेकांचे रोजगार गेले. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कोरोनाचा सामना करण्याच्या दृष्टीने वर्तणूक अंगीकारणे आवश्यक आहे. राज्यात आपण या तीन लाटांच्या काळात सुरू केलेल्या आरोग्य सुविधा बंद केल्या नसल्या तरी त्या वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

प्रश्नांची दखल घ्या : विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सामान्यांचे प्रश्न तातडीने तिथेच सोडवावेत. धोरणात्मक बाबीशी संबंधित तेवढेच विषय मंत्रालयात यावेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

मास्क सक्तीची शिफारस नाही; मुख्यमंत्री घेणार निर्णय गर्दीच्या वा बंदिस्त ठिकाणी मास्कसक्तीची शिफारस टास्क फोर्सने केलेली नाही. मास्क वापराची सवय लावावी, गर्दी असलेल्या तसेच बंदिस्त ठिकाणी, रुग्णालयांमध्ये मास्क वापरावर भर द्यायला हवा, असे टास्क फोर्सने म्हटले आहे. पंतप्रधानांसोबतच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केंद्राने केलेल्या सादरीकरणात मास्क वापराचा आग्रह धरला गेला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे लवकरच पुन्हा टास्क फोर्सशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते. 

लसीकरण सक्तीचे करा

लसीकरण सक्तीचे करा तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बूस्टर डोस देताना नऊ महिन्यांचा कालावधी कमी करा, या मागण्यांचे पत्र केंद्र सरकारला पाठविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. साठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना बूस्टर डोस खासगी रुग्णालयांमध्ये पैसे देऊन घ्यावा लागत आहे. त्यांनाही सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत बूस्टर डोस देण्याचा विचार सरकार करणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे