कामावर लक्ष द्या, वाद टाळा
By Admin | Updated: June 29, 2014 02:26 IST2014-06-29T02:26:10+5:302014-06-29T02:26:10+5:30
कामावर लक्ष द्या, आचार, विचार आणि सद्वर्तनावर भर द्या़ वादग्रस्त वक्तव्ये टाळा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांना दिला़

कामावर लक्ष द्या, वाद टाळा
>सूरजकुंड (हरियाणा) : लोक तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत़ तेव्हा कामावर लक्ष द्या, आचार, विचार आणि सद्वर्तनावर भर द्या़ वादग्रस्त वक्तव्ये टाळा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांना दिला़
लोकसभा व राज्यसभेच्या पक्षाच्या 15क् वर नवनिर्वाचित खासदारांसाठी भाजपाने हरियाणातील सूरजकुंड येथे दोन दिवसांचे (शनिवार व रविवार) प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आह़े आज शनिवारी या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मोदी बोलत होत़े आपण विरोधी बाकांवरून सत्ताधारी बाकांवर आलो आहोत़
आपल्या शिरावर मोठी जबाबदारी आह़े अशा स्थितीत वाद टाळून विकासावर भर द्या़ सुशासनाचा संदेश लोकांर्पयत पोहोचवा, असे अनेक सल्ले मोदींनी पक्ष खासदारांना दिल़े
खासदार बनणो एक महत्त्वपूर्ण संधी आह़े; म्हणूनच हे पद गंभीरपणो घ्या़ केवळ संसदेतच नाही, तर संसदेबाहेरच्या तुमच्या कामावर लोकांचे लक्ष आहे, याचे कायम भान ठेवा, असेही मोदी म्हणाल़े
काँग्रेसवर टीका
पक्ष खासदारांना संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला़ काँग्रेसच्या ध्येयधोरणांनी देशाचे वाटोळे केले आह़े आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भुईसपाट करा, असे आवाहन त्यांनी केल़े
(लोकमत न्यूज नेटवर्क)
काय आहे प्रशिक्षण शिबिरात
-आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर भाजपाने नव्या खासदारांसाठी हे प्रशिक्षण शिबीर आयोजिले आहे. भाजपाचे बहुतांश खासदार प्रथमच निवडून आले आहेत़ अशा स्थितीत या खासदारांना संसदेतील कामकाज, संसदीय प्रक्रिया़, जबाबदा:या आदी तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आह़े
बारकावे समजून घेण्यासाठी विषयाच्या खोलात जा!
-अंतर्गत मतभेद चव्हाटय़ावर न आणता एखाद्या कुटुंबाप्रमाणो काम करा
-नाहक वाद ओढवून घेणो टाळा़
-लहानसहान मुद्यांना आणि टीकेला बळी पडू नका़ तटस्थपणो त्याला सामोरे जा़
-आपली कर्तव्ये मिशन म्हणून स्वीकारा़
-आपापल्या मतदारसंघात जनहिताला प्राधान्य द्या़
-विविध विषयांतील बारकावे समजण्यासाठी अभ्यास करा़ त्या विषयांच्या खोलात जा़
-सोशल मीडियाचा पक्षाचे काम आणि सुशासनाचा संदेश लोकांर्पयत पोहोचविण्यासाठी अधिकाधिक वापर करा़
-संसदीय प्रक्रियांचे पालन करा़ त्या मर्यादेत राहून काम करा़