शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकरा पदोन्नतींसह ५० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांकडे लक्ष; प्राथमिक कार्यवाही सुरु झाल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 12:01 IST

कोरोनामुळे यंदा ३० जूनपर्यंत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली होती.

जमीर काझी -मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा राज्यातील सत्ताधाऱ्यांशी संबंधित प्रकरणांवर कारवाईचा बडगा व त्या अनुषंगाने राजकीय घडामोडींनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचवेळी पोलीस वर्तुळात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नती व बदल्यांबाबत उत्सुकता लागली आहे. ११ बढत्यांसह जवळपास ५० आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुहूर्त कधी मिळतो, याकडे सर्वाचे लक्ष आहे. पोलीस उपायुक्त ते विशेष महानिरीक्षक दर्जापर्यंतचे हे अधिकारी आहेत.कोरोनामुळे यंदा ३० जूनपर्यंत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली होती. आता एका पदावर किमान दोन वर्षे पूर्ण झालेल्यांमध्ये राज्य पोलीस दलातील ११ अतिरिक्त महासंचालकांच्या तर ८ विशेष महानिरीक्षक, ७ एडीसीपी-डीआयजी व ३४ उपायुक्त,-अधीक्षकांचा समावेश आहे, त्यापैकी काहींचा अपवाद वगळता सर्वांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. तर पदोन्नतीसाठी पात्र काहीजणांना त्याचठिकाणी बढती दिली जाणार असल्याचे सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.आठवड्याभरात बैठक घेऊन बदल्यांबाबत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्याबाबतची प्राथमिक कार्यवाही सुरु आहे. जुलैच्या मध्यापर्यंत आदेश जारी केले जातील, असे गृह विभागातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.गेल्यावर्षीच्या बदल्यांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या पीएवर आहे. त्याचा दबाव यंदाच्या पोलिसांच्या सर्वसाधारण बदल्यांवर आहे.  यासाठी शक्यतो सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बढत्या व बदल्यांचे आदेश काढले जावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचे सांगण्यात आले.

हे आहेत बढती मिळणारे अधिकारीआयजी प्रवीण साळुंखे, निकेत कौशिक, निखिल गुप्ता, मधुकर पांडये, ब्रिजेश सिंह, चिरंजीव प्रसाद व रवींद्र सिंगल यांना एडीजी म्हणून पदोन्नती दिली जाईल, तर सोलापूरचे आयुक्त अंकुश शिंदे यांना आयजीची बढती मिळेल. उपायुक्त राजीव जैन, इशू सिंधू व अभिषेक त्रिमुखे यांचे डीआयजी म्हणून प्रमोशन केले जाणार असल्याचे सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. 

टॅग्स :PoliceपोलिसState Governmentराज्य सरकार