मुंबई : राज्याच्या बहुतांश भागावर नैसर्गिक जलआपत्ती ओढवली असताना सत्ताधारी भाजप व शिवसेना प्रचारयात्रा काढण्यात व्यस्त आहेत. हे असंवेदनशिलतेचे लक्षण आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांनी प्रचार यात्रा रद्द करुन पूरग्रस्तांना मदत पोहचविण्यास प्राथमिकता द्यावी. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख मदत द्यावी. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा आकडा मोठा असल्याने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि पीडितांना विनाविलंब नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
‘पूरग्रस्त वाऱ्यावर; सत्ताधारी प्रचारावर’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 05:09 IST