उड्डाणपुलावर अवतरले वन्य प्राणी अन् पक्षी...!

By Admin | Updated: May 4, 2017 21:57 IST2017-05-04T21:57:30+5:302017-05-04T21:57:30+5:30

शहरातील सिडको बसस्थानक चौकातील उड्डाणपूलाखाली सध्या जंगलातील वाघ, गेंडा, हत्ती, माकड, हरीण आणि पक्षी पाहण्यास प्रत्येक जण क्षणभर थांबत आहे.

Floodplain is a wild animal and bird ...! | उड्डाणपुलावर अवतरले वन्य प्राणी अन् पक्षी...!

उड्डाणपुलावर अवतरले वन्य प्राणी अन् पक्षी...!

>संतोष हिरेमठ / ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 4 - शहरातील सिडको बसस्थानक चौकातील उड्डाणपूलाखाली सध्या जंगलातील वाघ, गेंडा, हत्ती, माकड, हरीण आणि पक्षी पाहण्यास प्रत्येक जण क्षणभर थांबत आहे. घाबरू नका..हे सर्व खरेखुरे प्राणी, पक्षी जंगलातून रस्त्यावर आले नसून उड्डाणपूलावर साकारलेल्या थ्रीडी चित्रांच्या माध्यमातून अवतरले आहेत. चित्रांच्या माध्यमाततून शहर सुंदर दिसण्यासह देश-विदेशातून येणा-या पर्यटकांना जिल्ह्यातील गौताळा अभयारण्य तसेच जायकवाडी पक्षी अभयारण्याची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 वाहतूक कोंडी कमी करण्यासह शहराच्या सौंदर्यीकरणात उड्डाणपूल भर टाकतात. परंतु कोट्यवधी रुपये खर्च करून उड्डाणपुलांची उभारणी होत नाही तोच त्यांना जाहिरातींच्या पेटिंग, पोस्टर्सचा विळखा पडतो. त्यामुळे शहरातील उड्डाणपूल फुकटात चमकोगिरी करणाºयांचे केंद्र बनल्याचे पहायला मिळते. जालना रोडवरील क्रांतीचौक, सेव्हन हिल उड्डाणपुलांखाली हे चित्र दिसून येते. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाºया पर्यटकांसमोर एक वेगळी प्रतिमा तयार होते. हीच बाब लक्षात घेऊन इरा इंटरनॅशनल स्कूलने सिडको उड्डाणपूलाच्या माध्यमातून शहराची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. महापालिक ा प्रशासनाकडून परवानगी घेत या उड्डाणपुलाखाली वन्य प्राणी, पक्ष्यांसह शहरातील ऐतिहासिक दरवाजे, जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचे थ्रीडी चित्रे रेखाटली जात आहे.
 
चित्रकार समशेर पठाण हे आपल्या सहकाºयांसोबत मागील पंधरा दिवसांपासून ही चित्रे साकारत आहे. यामध्ये आतापर्यंत वाघ, गेंडा, हत्ती, माकड,हरीण, विविध पक्षी साकारण्यात आले आहे. ही चित्रे पाहताना क्षणभर खरेखुरे प्राणी,पक्षी नजरे समोर उभी असल्याचा, धावत असल्याचा भास होतो. त्यामुळे या ठिकाणाहून जाणारा प्रत्येक जण चित्र पाहण्यात हरवून जात आहे. अशा चित्रांवर म्हणजे उड्डाणपुलावर जाहिराती लावण्याचा विचारही कोणाच्या मनात येणार नाही. त्यामुळे या चित्रांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. 
 
ऐतिहासिक शहर
यापूर्वी अनेक चित्रे रेखाटली आहे. परंतु उड्डाणपुलावर ही चित्रे रेखाण्याचा अनुभव वेगळाच आहे. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे. शिवाय अभयारण्यही आहेत. त्यावर आधारितच चित्र रेखाटली जात आहे.
-समरेश पठाण, चित्रकार
 
सुंदर शहराचे दर्शन
शहरात प्रवेश करताना या उड्डाणपुलाच्या माध्यमातून शहर आणि जिल्ह्याच्या सौंदर्याचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. साकरेल्या काही चित्रातील प्राणी आपल्या येथील अभयारण्यात नाही. परंतु त्याद्वारे जिल्ह्याचे वैभव दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. 
-डॉ. सतीश गोरे, इरा इंटरनॅशनल स्कूल
 
कलावंतांची बैठक घेणार
चित्रांच्या माध्यमातून सुंदर शहर दर्शविता येईल. शहरातील कलावंतांच्या माध्यमातून शहराच्या सौंदर्यात भर टाकता येईल, यादृष्टीने लवकरच बैठक घेतली जाईल. प्रत्येकाच्या कल्पनेनुसार त्यासाठी योगदान देता येईल.
-प्रा. अशोक तांबटकर, ज्येष्ठ चित्रकार
 

Web Title: Floodplain is a wild animal and bird ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.