शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना ‘निकषांबाहेर’ दिलासा; पूर्णतः नुकसान झालेल्या कच्च्या आणि पक्क्या घरांसाठी दीड लाखाची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 11:52 IST

राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच याबाबतचा निर्णय घेतला होता आणि मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार महसूल विभागाने आदेश काढले आहेत.

मुंबई : अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांना राज्य शासनाने बुधवारी आर्थिक मदत जाहीर केली. पूर्णपणे घर नष्ट झालेल्यांना प्रत्येकी दीड लाख रुपये अर्थसाहाय्य दिले जाईल, त्यात कच्च्या आणि पक्क्या घरांचा समावेश असेल.

राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच याबाबतचा निर्णय घेतला होता आणि मदतीचे पॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार महसूल विभागाने आदेश काढले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांबाहेर जाऊन मदत देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. अंशतः पडझड (किमान ५० टक्के) झालेल्या कच्च्या-पक्क्या घरांसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले जातील. किमान २५ टक्के पडलेल्या घरांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत दिली जाईल. किमान १५ टक्के पडझड झालेल्या घरांसाठी प्रत्येकी १५ हजार रुपये तसेच नष्ट झालेल्या कपड्यांसाठीही प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना प्रतिकुटुंब पाच हजार रुपये, कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रति कुटुंब ५ हजार रुपये, घरगुती भांडी/वस्तूंच्या नुकसानीसाठीही देण्यात येतील. ४८ तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी घर पाण्यात बुडालेले असण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. जनावरांसाठीची मदत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांकडील जनावरे मृत झाली, त्यांनाही मदत दिली जाणार आहे. दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी ४० हजार, ओढकाम करणारी जनावरे प्रत्येकी ३० हजार, ओढकाम करणारी लहान जनावरे प्रत्येकी २० हजार, मेंढी, बकरी, डुक्कर  प्रत्येकी ४ हजार रुपये, कुक्कुटपालन पक्षी प्रत्येकी ५० रुपये (पाच हजार रुपयांपर्यंत) अशी मदत दिली जाईल. कुक्कुटपालन शेड  नुकसानीसाठी प्रत्येकी ५  हजार रुपये, मत्स्य बोटींचे अंशतः नुकसान झालेले असल्यास प्रत्येकी १० हजार रुपये, पूर्णपणे नुकसान २५ हजार रुपये, मत्स्य जाळ्यांचे अंशतः नुकसान ५ हजार रुपये आणि पूर्णपणे नुकसान झाले तरी ५ हजार रुपयांची मदत दिली जाईल.

अंशतः पडझड (किमान ५० टक्के) झालेल्या कच्च्या-पक्क्या घरांसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिले जातील. 

किमान २५ टक्के पडलेल्या घरांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत दिली जाईल. 

किमान १५ टक्के पडझड झालेल्या घरांसाठी प्रत्येकी १५ हजार रुपये तसेच नष्ट झालेल्या कपड्यांसाठीही प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

पंचनाम्याच्या आधारे मदत- हस्तकला, हातमाग कारागीर बाराबलुतेदार, मूर्तिकार यांना प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल. दुकानदारांना सरसकट किमान ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत-जास्त ५० हजार  रुपयांपर्यंत मदत दिली जाईल. - टपरीधारकांना प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत-जास्त १० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल. स्थानिक रहिवाशांचे स्थानिक मतदार यादीत नाव आहे व रेशनकार्डधारक आहेत, त्यांना पंचनाम्याच्या आधारे मदत मिळेल. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेfloodपूर