शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

हा महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, मानवी चुकांबरोबरच प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत

By वसंत भोसले | Published: August 11, 2019 5:47 AM

दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलयंकारी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाही प्रामुख्याने कारणीभूत आहेत.

- वसंत भोसलेकोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलयंकारी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाही प्रामुख्याने कारणीभूत आहेत. त्यामुळे शासन, प्रशासन आणि जनतेला हात वर करून केवळ निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. याउलट मानवाच्या असंख्य चुका निसर्गाने वारंवार दाखवून देऊनही त्यात सुधारणा करण्याची कोणाची तयारी नाही. त्याचाच फटका निसर्गाने पुन्हा एकदा दिला आहे, हे स्पष्ट होते आहे.दक्षिण महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर तसेच बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागाला या महापुराचा प्रचंड तडाखा बसला आहे. यापूर्वी १९५३, १९८३ आणि २००५ मध्ये महापुराने असा फटका दिला होता. महाबळेश्वरमध्ये उगम पावणा-या कृष्णा नदीचे हे खोरे आहे. महाबळेश्वर ते कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीजवळील दाजीपूरपर्यंतच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून दोन डझन नद्यांचा उगम होतो. त्यांपैकी बहुतांश नद्यांवर धरणे आहेत. त्यांची साठवण क्षमता सुमारे २१० टीएमसी आहे. या सर्व नद्यांचा संगम होत होत शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे सर्व पाणी जमा होते. तेथून कृष्णा नदी कर्नाटकात जाते.नद्यांच्या पात्रातील वाळू उपसा केल्याने त्यांचे निसर्गचक्रही बिघडले आहे. मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. नद्यांची पात्रे अरुंद झाली आहेत आणि नद्यांच्या पात्रापर्यंत शेतजमिनी तयार करून उसाची शेती नदीकाठापर्यंत करण्यात आली आहे. त्याच्या परिणामामुळे नद्यांच्या पात्रात पाणी कमी आणि उभ्या पिकांमध्ये अधिक अशी अवस्था झाली आहे.नद्यांच्या पूरनियंत्रण रेषेत झालेली बांधकामे, धरणांचे अतिरिक्त पाणी एकाच वेळी सोडावे लागण्याचे संकट, नद्यांच्या रचनांमधील फेरबदल, नद्यांवरून जाणाºया रस्त्यांमुळे अडणारे पाणी आदी मानवी चुकांचा फटका आहे. महापुराची तीव्रता गंभीर करणारी ही कारणे ठरली आहेत. कमी कालावधीत पडणारा मोठा पाऊस, धरणे क्षमतेपेक्षा अधिक भरणे आणि पाणलोट क्षेत्राच्या बाहेर पडणाºया पावसाच्या पाण्याचा समावेश करून घेण्यास जागा नसणे आदी मानवी चुकांचा सर्वाधिक फटका बसत आहे.गतवेळच्या महापुराची तीव्रता, त्याचे परिणाम आणि निर्माण होणारे धोके आजवर रेकॉर्डवर आलेले आहेत. तरीही राज्य प्रशासनाची यंत्रणा तत्परतेने काळजी घेत नाही हीदेखील मानवी चूकच आहे. सांगलीजवळील ब्रह्मनाळची घटना हे त्याचे ताजे उदाहरण आहे. क-हाड ते सांगलीपर्यंत किती पाणीपातळी कोठे आली, तर कोणती गावे संकटात येतात, याचे गणित मांडावे असे आहे. २००५च्या पुरातही ब्रह्मनाळ गाव पाण्याने वेढले गेले होते. या गावाला सर्वप्रथम हलविण्याची गरज आहे. त्यासाठी एनडीआरएफ किंवा लष्कराला पाचारण केले पाहिजे. हरिपूर या गावची हीच कहाणी आहे. तेथे तर नदीच्या काठावरच बंगले बांधले गेले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात पूर आल्यावर आंबेवाडी, प्रयाग चिखलीसारखी गावे सर्वप्रथम पाण्याने वेढली जातात. पडणारा पाऊस, भरलेली धरणे, त्यातून सोडण्यात येणारे पाणी तसेच कोल्हापूर आणि सांगलीचा कोणता भाग पाण्याखाली जाणार, हे गणिताप्रमाणे मांडता येऊ शकते; पण हे सर्व रेकॉर्ड, नकाशे तयार कोठे आहेत? ही प्रशासनाची म्हणजे मानवाची चूक आहे. ब्रह्मनाळचे बळी त्याचे आहेत, निसर्गाने घेतलेले नाहीत.‘अलमट्टी’ची चर्चा ही केवळ फसवाफसवीकर्नाटकातील बागलकोटजवळ कृष्णा नदीवर असलेल्या अलमट्टी धरणामुळे फुगवटा येतो. परिणामी, महाराष्ट्रातील नद्यांची पातळी वाढते, अशी चर्चा राजकारणी मंडळी करून लोकांची दिशाभूल करतात. महाराष्ट्रातून साडेतीन लाख क्युसेक्स पाण्याची आवक अलमट्टी धरणात होत असेल, तर त्यांना चार लाख क्युसेक्स पाणी सोडावे लागते. ते यापूर्वी सोडले आहे. यावषीर्ही सोडले. याचा परिणाम अलमट्टी धरणाच्या खालील रायचूर, यादगीर आणि विजापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो. आपल्याकडील पाणी पुढे सरकत नाही. ते अडविले गेले असल्याने महापुराची तीव्रता वाढली आहे. याकडे दुर्लक्ष करण्यासाठी ‘अलमट्टी’ची चर्चा घडवून फसवाफसवी केली जात आहे.

टॅग्स :floodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर