पळून गेलेल्या मुली परतल्या
By Admin | Updated: October 10, 2014 05:45 IST2014-10-10T05:45:50+5:302014-10-10T05:45:50+5:30
घरातून पळ काढून मुंबई गाठणाऱ्या कोकणातील दोन तरुणींना पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्यात ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला यश आले आहे.

पळून गेलेल्या मुली परतल्या
ठाणे : घरातून पळ काढून मुंबई गाठणाऱ्या कोकणातील दोन तरुणींना पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्यात ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटला यश आले आहे. यातील एक २१ वर्षीय तरुणी नोकरी करण्यासाठी रत्नागिरीतले घर सोडून ठाण्यात आली होती, तर एका १७ वर्षीय तरुणीने पालक ओरडल्यामुळे ठाण्यातून कुर्ला गाठले होते. त्यांचे समुपदेशन केले असता हा प्रकार उघडकीस आला.
पाली गावात राहणारी विद्यार्थिनी ५ सप्टेंबर रोजी राबोडी परिसरात ठाणे पोलिसांना आढळली. तिला रडताना पाहून पोलिसांनी तिची चौकशी केली. मात्र तिने पोलिसांना काहीही सांगण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी तिला चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या स्वाधीन केले. पोलीस शिपाई प्रतिभा मनोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते असल्याचे सांगून तिला बोलते केले. तेव्हा तिने ठाण्यातील तिच्या एका मैत्रिणीने नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. त्यानुसार, ती ४ सप्टेंबर रोजी रत्नागिरीतून ठाण्यात आली होती. पण मैत्रिणीशी संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांनी तिच्या पालकांशी संपर्क साधून तिला घरी पाठवले.
राबोडी पोलीस ठाण्यात एक १७ वर्षीय तरुणी हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. घरात काम करीत नसल्याने तिची आई तिला ओरडली होती.तिचा मोबाइल फोन चालू होता. पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधले असता ती कुर्ल्यात असल्याचे समजले.