पळून गेलेले कैदी छिंदवाड्यात!

By Admin | Updated: April 7, 2015 04:20 IST2015-04-07T04:20:08+5:302015-04-07T04:20:08+5:30

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून मंगळवारी पळून गेलेले पाचही खतरनाक कच्चे कैदी मध्य प्रदेशच्या छिंदवाड्याकडे पळून गेले.

The fledged prisoner is in Chhindwara! | पळून गेलेले कैदी छिंदवाड्यात!

पळून गेलेले कैदी छिंदवाड्यात!

नागपूर : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून मंगळवारी पळून गेलेले पाचही खतरनाक कच्चे कैदी मध्य प्रदेशच्या छिंदवाड्याकडे पळून गेले. टोळीचा म्होरक्या राजा गौसही पळून जाणार होता. परंतु त्याला एका पायाने चालताच येत नसल्याने त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. या कैद्यांच्या पलायनास मदत करणाऱ्या मानकापूरच्या तरुणाला शहर गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानेच पलायनाची ही माहिती पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
बिसनसिंग रामूलाल उईके, शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलिम खान (२४) , सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता (२५), प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री (२४) आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (२३) रा. कुतबिशहानगर गिट्टीखदान, अशी पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत. सूत्रांकडून सांगण्यात आलेल्या या तरुणाच्या माहितीनुसार कारागृहातून पलायन करण्याचा कट दोन महिन्यांपूर्वीच शिजला होता. या कटात काही सुरक्षा रक्षकही सामील झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: The fledged prisoner is in Chhindwara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.