फळबाग लागवडीसाठी नोव्हेंबरपर्यत मुदत

By Admin | Updated: August 21, 2015 23:15 IST2015-08-21T23:15:57+5:302015-08-21T23:15:57+5:30

रोहयोअंतर्गत फळझाड लागवडीव्दारे फळविकासाची योजना यावर्षीही सुरू.

Fixed up to November for planting orchards | फळबाग लागवडीसाठी नोव्हेंबरपर्यत मुदत

फळबाग लागवडीसाठी नोव्हेंबरपर्यत मुदत

खामगाव (बुलडाणा): बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत रोजगार हमी योजनेशी निगडीत असलेली फळझाड लागवडीव्दारे फळविकासाची योजना यावर्षीही सुरू राहणार असून, विदर्भात या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी नोव्हेंबरपर्यंंंत मुदत राहणार आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांना उशिरापर्यंंत लागवड करण्याची संधी राहणार आहे. या फळ विकास योजनेअंतर्गत यावर्षी राज्यात ७ हजार हेक्टर क्षेत्रावर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. लागवडीसाठी आवश्यक असलेली कलमे, रोपे शासकीय रोपवाटीका, कृषी विद्यापीठ रोपवाटीका, शेती महामंडळ, कृषी विज्ञान केंद्र व राज्यातील खासगी नोंदणीकृत रोपवाटिकांकडून उपलब्ध करून घ्यावी लागणार आहेत. यासाठी जिल्हानिहाय लागवडीचे उद्दीष्ट संचालक, फलोत्पादन, कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडून निश्‍चित करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जी फळझाडे लागवडीस उपयुक्त ठरतील व जिवंत राहू शकतील अशा फळझाडांची लागवड करावी लागणार आहे. फळझाड लागवडीसाठी कोकण विभागासाठी ३0 सप्टेंबर आणि उर्वरीत विभागासाठी ३0 नोव्हेंबरपर्यंंंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी संकटात सापडत असलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी व पशुसंवर्धन विभागाने २0 ऑगस्ट रोजी जाहीर केला.

Web Title: Fixed up to November for planting orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.