पाच वर्षात पोलिसांची 63 हजार पदे भरणार
By Admin | Updated: July 13, 2014 01:38 IST2014-07-13T01:38:40+5:302014-07-13T01:38:40+5:30
महाराष्ट्राला कधी नक्षलवाद्यांशी सामना करावा लागतो, तर कधी आतंकवादाला तोंड द्यावे लागते.

पाच वर्षात पोलिसांची 63 हजार पदे भरणार
तासगाव (जि़ सांगली) : महाराष्ट्राला कधी नक्षलवाद्यांशी सामना करावा लागतो, तर कधी आतंकवादाला तोंड द्यावे लागते. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, लोकसंख्या या पाश्र्वभूमीवर मोठी पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस दलात करण्यात आली आहे. तरीही पोलिसांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळेच या वर्षासह पुढील पाच वर्षात 63 हजार पोलिसांची अतिरिक्त भरती केली जाणार आहे. त्या प्रमाणात अधिका:यांचीही संख्या वाढवली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शनिवारी दिली.
तुरची (ता. तासगाव) येथे महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या 1क्9 क्रमांकाच्या तुकडीतील 225 पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात ते बोलत होते. गृहमंत्री पाटील म्हणाले की, एका बाजूला पोलिसांची संख्या वाढवत असताना गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे. सायबर क्राईम, आर्थिक गुन्हेगारी, बदलणारे कायदे लक्षात घेऊन यापुढच्या काळात पोलीस दलाला अधिक सक्षम बनवणो गरजेचे आहे. (वार्ताहर)