तहसीलदार हल्लाप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: August 20, 2014 02:25 IST2014-08-20T02:25:37+5:302014-08-20T02:25:37+5:30
मुकेश जितेंन्द्र स्वामी (33) याला मंगळवारी ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे.काळे यांनी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

तहसीलदार हल्लाप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी
ठाणो : वाडय़ाचे तत्कालीन तहसीलदार संतोष शिंदे यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ (ऑईल) टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करणा:या मुकेश जितेंन्द्र स्वामी (33) याला मंगळवारी ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे.काळे यांनी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
सरकारी कर्मचा:यांना त्रस देण्याचा पिंड असलेल्या मुकेशने शिंदे यांच्याकडे एका कंपनीच्या खदाणीच्या कामाबाबत निवेदन दिले होते. याचदरम्यान,11 जुलै 2क्11 मध्ये वाडय़ातील आंबीस्ते ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी झाल्यानंतर शिंदे हे तेथून पावणो बाराच्या सुमारास बाहेर पडल्यानंतर मुकेशने त्यांच्या अंगावर ऑईल ओतले. मात्र शिंदे यांनी वेळीच प्रसंगवधान होऊन त्याला जमिनीवर खाली ढकलल्याने ते बचावले .
हे प्रकरण ठाणो जिल्हा व सत्र न्यायालयात आल्यावर मुकेशला दोषी ठरवले. शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला पाच वर्षे तर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक वर्ष आणि सरकारी अधिका:यास मारहाण केल्याप्रकरणी दोन वर्षाची सक्तमजुरी सुनावली आहे. त्याच गुन्ह्यांत प्रत्येकी एक हजार असा तीन हजारांचा दंड सुनावला असून तो न भरल्यास त्याला तीन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)