वीज अंगावर पडल्याने नांदेडमध्ये पाच महिलांचा मृत्यू
By Admin | Updated: June 12, 2017 21:29 IST2017-06-12T20:56:41+5:302017-06-12T21:29:03+5:30
शेतात कचरा वेचत असताना वीज अंगावर पडून पाच महिला मृत्युमुखी पडल्या.

वीज अंगावर पडल्याने नांदेडमध्ये पाच महिलांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
उमरी (जि. नांदेड), दि. 12 : शेतात कचरा वेचत असताना वीज अंगावर पडून पाच महिला मृत्युमुखी पडल्या. ही घटना १२ जून रोजी दुपारी ४़:३० वाजेच्या उमरी तालुक्यातील कारला गावच्या शिवारात घडली़ आहे. सर्व महिला शेतात कचरा वेचण्याचे काम करीत होत्या़. दुपारी ४ वाजेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली़ त्यामुळे सर्व महिला निवाऱ्यासाठी झाडाखाली थांबल्या़ होत्या. दरम्यान, विजांचा कडकडाट झाला व वीज झाडावर पडली़ यात पाचही महिला जागीच मृत्युमुखी पडल्या़.
विशेष म्हणजे, १० जून रोजी याच परिसरात सीतानगर तांडा शिवारात राजेश जाधव (वय १८) या तरुण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला होता़ एकाच आठवड्यात तालुक्यात विजा पडून ६ जणांचे बळी गेले़ कारला येथील सोमवारच्या घटनेच्यावेळी शेतात कुणीही पुरुष नव्हता़ शेतमालकाची पत्नी असलेल्या शोभाबाई भुताळे यांचाही मृतांमध्ये समावेश आहे़.
घटनास्थळी कुणाजवळ टोपली, पाण्यासाठीची भांडी, एका महिलेजवळ रात्रीच्या स्वयंपाकासाठी चुलीला लागणारे जळतण असे साहित्य पडले होते़ या घटनेमुळे आज रात्री कारला येथील एकाही घरात चूल पेटली नसून गावात शोककळा पसरली़.
मयत महिलांची नावे - शोभाबाई देवीदास जाधव (वय ४८), मोहनाबाई गंगाधर सोनवणे (४८), शोभाबाई संभाजी भूताळे (४५) (शेतमालक), रेखाबाई मारोती पवळे (३६), शेषाबाई माधव गंगावणे (४९)