गोव्यात सेल्फी काढताना पाच पर्यटक कडयावरुन कोसळले

By Admin | Updated: March 3, 2016 17:22 IST2016-03-03T17:22:40+5:302016-03-03T17:22:40+5:30

भन्नाट सेल्फी काढण्याच्या मोहापायी गोव्यात पाच पर्यटक कडयावरुन कोसळून जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Five tourists were stranded in Goa while sailing in Goa | गोव्यात सेल्फी काढताना पाच पर्यटक कडयावरुन कोसळले

गोव्यात सेल्फी काढताना पाच पर्यटक कडयावरुन कोसळले

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ३ - भन्नाट सेल्फी काढण्याच्या मोहापायी गोव्यात पाच पर्यटक कडयावरुन कोसळून जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. गोव्याच्या प्रसिद्ध अंजूना गावामध्ये २२ फेब्रुवारीला ही घटना घडली. या दुर्घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
अंजूना गावात टेकडीवर असलेल्या कॉटेजमध्ये ही दुर्घटना घडली. हे पाच पर्यटक सेल्फी काढत असताना ही दुर्घटना घडली. दोन महिला खडकावर आपटल्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. प्रथमोपचारानंतर तिघांना घरी सोडण्यात आले अशी माहिती पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी दिली.
या दोन महिलांचे कुटुंबिय पोलिस तक्रार दाखल करायला नकार देत होते. पोलिसांनी या महिलांची ओळख उघड केलेली नाही. मात्र या दुर्घटनेत जखमी झालेले पर्यटक विशीतील असल्याचे सांगितले.
 

Web Title: Five tourists were stranded in Goa while sailing in Goa