पाच हजारांत डॉक्टरकी; गुन्हा दाखल

By Admin | Updated: July 23, 2015 01:27 IST2015-07-23T01:27:09+5:302015-07-23T01:27:09+5:30

पाच हजारांत डॉक्टर करणाऱ्या रॅकेटचा ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे मंगळवारी रात्री पर्दाफाश केल्यानंतर बोगस डॉक्टरचे रॅकेट चालविणाऱ्या

Five thousand doctors; Filed the complaint | पाच हजारांत डॉक्टरकी; गुन्हा दाखल

पाच हजारांत डॉक्टरकी; गुन्हा दाखल

दत्ता थोरे , लातूर
पाच हजारांत डॉक्टर करणाऱ्या रॅकेटचा ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे मंगळवारी रात्री पर्दाफाश केल्यानंतर बोगस डॉक्टरचे रॅकेट चालविणाऱ्या आर. बी. वाडकरविरुद्ध महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. महेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. वाडकरच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
वाडकरच्या नातेवाइकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा मोबाइल आॅऊटआॅफ कव्हरेज आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी दिली. बोगस डॉक्टर प्रतिबंधक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री टाकलेल्या धाडीत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या औषधांचे नमुने तपासणीसाठी राज्य प्रयोगशाळेला पाठविण्यात येणार आहेत.
लातूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या ‘लोकमत’च्या या स्टिंग आॅपरेशनने आरोग्य खाते हादरले. बुधवारी दिवसभर त्याची चर्चा होती. मंगळवारी मध्यरात्री धाड टाकलेल्या अधिकाऱ्यांनी बुधवारी एमआयडीसी पोलिसांत वाडकरविरुद्ध गुन्हा
दाखल केला.
जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या आदेशाने झालेली ही पहिलीच कारवाई ठरली.

Web Title: Five thousand doctors; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.