राज्यातील चौदा हजार पूलांच्या दुरूस्तीसाठी पाच हजार कोटी : चंद्रकांत पाटील

By Admin | Updated: February 27, 2017 22:19 IST2017-02-27T22:08:36+5:302017-02-27T22:19:10+5:30

सावित्री नदीवरील पूल पूराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर सरकारला जाग आली असून ब्रिटिशकालीन लहान मोठ्या अशा एकूण चौदा हजार पूलांच्या दुरूस्ती

Five thousand crores for the repair of fourteen thousand corridors in the state: Chandrakant Patil | राज्यातील चौदा हजार पूलांच्या दुरूस्तीसाठी पाच हजार कोटी : चंद्रकांत पाटील

राज्यातील चौदा हजार पूलांच्या दुरूस्तीसाठी पाच हजार कोटी : चंद्रकांत पाटील

नाशिक :  राज्यातील ब्रिटिशकालीन लहान मोठ्या अशा एकूण चौदा हजार पूलांच्या दुरूस्ती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये केली.

सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या आढावा बैठकीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सदर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, महाडच्या दुर्घटनेनंतर सरकार हादरले. सरकारने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एजन्सीमार्फत राज्यातील एकूण १४ हजार जुन्या पूलांच्या बांधकामाचे परिक्षण करुन घेत त्यांच्या सध्यस्थितीचा अहवाल प्राप्त केला आहे. जे पूल अत्यंत जीर्णावस्थेत आहे त्यांची तातडीने दुरूस्तीचे काम यानुसार पहिल्या टप्प्यात हाती घेतले जाणार असल्याचे पाटील म्हणाले. चालू वर्षासाठी पूलांच्या दुरूस्तीकरीता एक हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. तीन ते चार वर्षांमध्ये राज्यातील एकूण चौदा हजार पूलांची दुरूस्ती व बांधणी करण्यास सरकारला यश येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या दुरूस्तीच्या कामासाठी विहित प्रक्रियेद्वारे संबंधित बांधकाम ठेकेदारांची निवड करावी जेणेकरून दुरूस्तीची कामे जलदगतीने पूर्ण होतील असेही त्यांनी सांगितले.
इन्फो---
महाड दुर्घटनेनंतर पूलांचा प्रश्न चव्हाट्यावर
रायगड जिल्ह्यातील सावित्रीनदीवरील पूल वाहून गेल्याची दुर्घटना महाड शहराजवळ आॅगस्ट महिन्यात घडली होती. या घटनेनंतर राज्यातील जुन्या पूलांच्या दुरूस्तीचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. मुख्यमंत्र्यांनी सर्व पुलांचे तातडीने बांधकाम परिक्षण करण्याचे आदेशही दिले होते.

 

Web Title: Five thousand crores for the repair of fourteen thousand corridors in the state: Chandrakant Patil