पाच संशयितांची नार्को चाचणी!
By Admin | Updated: November 9, 2014 01:30 IST2014-11-09T01:30:33+5:302014-11-09T01:30:33+5:30
तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघांची हत्या होऊन 19 दिवस उलटले असले तरी पोलिसांना अद्याप आरोपीर्पयत पोहोचण्यात यश आलेले नाही़

पाच संशयितांची नार्को चाचणी!
जवखेडे : परवानगीसाठी पोलीस न्यायालयात
पाथर्डी/अहमदनगर : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघांची हत्या होऊन 19 दिवस उलटले असले तरी पोलिसांना अद्याप आरोपीर्पयत पोहोचण्यात यश आलेले नाही़ या प्रकरणात आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने पोलिसांना या प्रकरणातील आरोपींचा शोध घेणो आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातील पाच संशयितांची नार्को चाचणी करण्याची पाथर्डी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे.
जवखेडे येथे जाधव कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याचे 22 ऑक्टोबरला उघडकीस आले होते. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून विहिरीत, बोअरवेलमध्ये टाकले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून दलित चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी, विविघ राजकीय पक्षांचे नेते आदींनी जवखेडेत येऊन या घटनेचा निषेध केला. सध्या राज्यभर तो विषय गाजत आहे. पोलीस खात्याची 1क् पथके तपासासाठी कार्यरत आहेत. नाशिक परिक्षेत्रचे महानिरीक्षक प्रवीण साळुंके हे अनेक दिवसांपासून पाथर्डीत तळ ठोकून आहेत. राज्य सरकारने सुद्धा या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. तातडीने तपास लावा़ वेळ पडली तर नार्को चाचणी करा, असे आदेश सरकारने पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी घटनेचे सर्व पैलू पडताळून पाहिले आहेत. परंतु पोलिसांना अद्यापतरी आरोपींर्पयत पोहोचता आले नाही. त्यामुळे पाथर्डी पोलिसांनी या प्रकरणातील पाच संशयित आरोपींची नार्को चाचणी घेण्यासाठी न्यायालयात परवानगी मागितली आहे. (प्रतिनिधी)
मानसशास्त्रीय चाचणी
जवखेडे हत्याकांडामध्ये पाच संशयितांचे जबाब घेण्यात येत आहेत. त्यांच्या सांगण्यामध्ये विसंगती आढळून आली आहे. त्यांनी दिलेली माहिती विपर्यस्त असल्याने त्या पाचही जणांची मानसशास्त्रीय चाचणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांनी दिली.