‘पंचतारांकित’ डान्सबारना बंदी!

By Admin | Updated: June 13, 2014 02:50 IST2014-06-13T02:50:08+5:302014-06-13T02:50:08+5:30

डान्सबारना पंचतारांकित हॉटेलांमधूनही बंदी करण्याची व शिक्षेची रक्कम आणि कालावधीत वाढ करणारी दुरुस्ती सुचविणाऱ्या डान्सबार बंदी कायद्याच्या मसुद्याला गुरुवारी मंत्रिमंडळाने मंजुरी

'Five-star' ban on dance bars! | ‘पंचतारांकित’ डान्सबारना बंदी!

‘पंचतारांकित’ डान्सबारना बंदी!

मुंबई : डान्सबारना पंचतारांकित हॉटेलांमधूनही बंदी करण्याची व शिक्षेची रक्कम आणि कालावधीत वाढ करणारी दुरुस्ती सुचविणाऱ्या डान्सबार बंदी कायद्याच्या मसुद्याला गुरुवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आघाडी सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरलेले आहेत. उद्या हे विधेयक विधानसभेत आणले जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
राज्यातील तरुण डान्सबारच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहेत, अनेक कुटुंबे याच डान्सबारमुळे देशोधडीला लागली म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात अशा बारवर बंदी आणण्यात आली होती. त्यावर बार मालकांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवली होती. राज्यातील तीन ते सात तारांकित हॉटेलांमध्ये या डान्सबारना परवानगी दिली जाते; मात्र अन्य ठिकाणी ती नाकारली जाते. सरकार असा पक्षपात करू शकत नाही, असा आधार न्यायालयाने यासाठी घेतला होता. सरकार विरोधीपक्षांना सोबत घेऊन पुन्हा नव्याने बारबंदी आणेल, असे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी जाहीर केले होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 'Five-star' ban on dance bars!