वसईजवळ एसटी - ट्रकची धडक, पाच ठार

By Admin | Updated: April 29, 2016 18:15 IST2016-04-29T18:12:39+5:302016-04-29T18:15:25+5:30

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसईजवळ स्वारगेटला जाणारी एसटी आणि ट्रक यांच्यात अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत.

Five people were killed in a truck collision near Vasai | वसईजवळ एसटी - ट्रकची धडक, पाच ठार

वसईजवळ एसटी - ट्रकची धडक, पाच ठार

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ -  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसईजवळ स्वारगेटला जाणारी एसटी आणि ट्रक यांच्यात अपघात झाला असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. 
वसईजवळील मालाजीपाडा हद्दीत हा भीषण अपघात घडला. एसटी बोईसरहून स्वारगेटला जात असताना पाठीमागून येणारा ट्रक एसटी बसवर जोरदार आदळला. हा अपघात दुपारी दोनच्या सुमारास घडला. 
दरम्यान, या अपघातात ट्रकमधील तीन आणि बसमधील दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर चार जण जखमी झाले असून त्याच्यांवर मीरारोड येथील आर्बिट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Web Title: Five people were killed in a truck collision near Vasai