लातूर : कीर्ती आॅइलमिलमधील नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली असून गुरुवारी या संशयित आरोपींना न्यायालयाने १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़कीर्ती आॅइलमध्ये सोमवारी दुपारी ४च्या सुमारास वेस्टेज टँकची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या ९ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला़ याप्रकरणी आॅइलमिलचे मालक कीर्तीकुमार भुतडा, शिवराम गायकवाड, अंगद गायकवाड, एकनाथ केसारे, मनोज क्षीरसागर यांच्याविरूद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केली होती़ (प्रतिनिधी)
‘त्या’ मालकासह पाच जणांना कोठडी
By admin | Updated: February 3, 2017 00:56 IST