मोटार उलटून सोलापूरचे पाच जण जखमी
By Admin | Updated: June 3, 2016 22:14 IST2016-06-03T22:06:51+5:302016-06-03T22:14:46+5:30
बीड बायपासवर भरधाव मोटारीचे समोरचे टायर फुटून झालेल्या अपघातात कारचालकासह पाच जण जखमी झाले. सर्व जखमी सोलापूरचे रहिवासी असून, ते एका कार्यक्रमासाठी औरंगाबादला

मोटार उलटून सोलापूरचे पाच जण जखमी
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 3 - बीड बायपासवर भरधाव मोटारीचे समोरचे टायर फुटून झालेल्या अपघातात कारचालकासह पाच जण जखमी झाले. सर्व जखमी सोलापूरचे रहिवासी असून, ते एका कार्यक्रमासाठी औरंगाबादला येत होते. शुक्रवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
बिल्किस बानो मोहंमद अय्युब (४७), जैनुद्दीन पटेल (३६), अय्युब इस्माईल पटेल (४८), इस्माईल अय्युब पटेल (२२), मोईन शेख अय्युब (२०, सर्व रा. सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, अय्युब पटेल हे मोटारीने (क्रमांक एमएच-१३ ए झेड ८९५४) शुक्रवारी नातेवाईकांसह सोलापूर येथून औरंगाबादला येत होते. बीड बायपास रोडवरील सहारा सिटीसमोरील एका नाल्यावरील छोट्या पुलावर मोटारीचे समोरचे टायर फुटल्याने मोटार कठड्याला धडकून पुलाच्या कठड्यात अडकली. प्रत्यक्षदर्शींनी जखमींना तातडीने मोटारीबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.