पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर

By Admin | Updated: March 15, 2015 00:41 IST2015-03-15T00:41:31+5:302015-03-15T00:41:31+5:30

स्वाइन फ्लूची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शनिवारी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत पाच रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

Five patients are on ventilator | पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर

पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर

पिंपरी : स्वाइन फ्लूची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शनिवारी शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत पाच रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. स्वाइन फ्लूची लागण झालेले नवीन ९ रुग्ण सापडले आहेत, तर ११ रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. बाह्यरुग्ण विभागात ३ हजार ९८३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील एक हजार २५० रुग्णांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसून आली. त्यामध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आलेल्या ४७५ रुग्णांना टॅमिफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. इतर रुग्णालयांत २४ रुग्ण भरती आहेत. आतापर्यंत दोन लाख ५५ हजार १५२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. ३९ हजार ४३५ जणांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून आली. ८ हजार ६२२ रुग्णांना टॅमिफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. ५०१ रुग्णांच्या थुंकीचे नमुने तापसणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. २५२ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २०९ रुग्णांचा स्वाइन फ्लू बरा झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Five patients are on ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.