छगन भुजबळ यांच्यासह पाच अधिका-यांवर गुन्हा
By Admin | Updated: June 8, 2015 22:06 IST2015-06-08T21:56:51+5:302015-06-08T22:06:59+5:30
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाऴा आणि मुंबईतील जमीन चुकीच्या पद्धतीने दिल्याप्रकरणी माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ

छगन भुजबळ यांच्यासह पाच अधिका-यांवर गुन्हा
लोकमत ऑनलाइन
मुंबई, दि. ०६ - दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाऴा आणि मुंबईतील काही जमीन चुकीच्या पद्धतीने दिल्याप्रकरणी माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह पाच अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार छगन भुजबळ यांच्यासह पाच अधिका-यांवर गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी योग्य ती चौकशी करण्यात येईल असे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त उपायुक्त एसजी नेकलीकर यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांच्यासह गजानन सावंत, हरिष पाटील, अनिल कुमार गायकवाड, संजय सोळंकी आणि एमएच शहा या अधिका-यांचा यामध्ये समावेश आहे.